• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • शाहिद कपूरच्या पावलांवर पाऊल ठेवत ही अभिनेत्री करणार Arrange Marriage

शाहिद कपूरच्या पावलांवर पाऊल ठेवत ही अभिनेत्री करणार Arrange Marriage

करिअरच्या सुरुवातीला तिचं एक अफेअर होतं. पण तो सिनेसृष्टीतील नव्हता. हळूहळू काम वाढू लागल्यामुळे दोघांमध्ये अंतर आलं आणि दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

 • Share this:
  मुंबई, 04 नोव्हेंबर- दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिने लग्नासंबंधीत प्रश्नांची अगदी सडेतोड उत्तरं दिली. या सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ती अरेंज मॅरेज करत आहे. आई- वडिलांनी पसंत केलेल्या मुलासोबत काजल लग्न करणार असून आपलं संपूर्ण आयुष्य त्या मुलासोबच घालवण्याचा निर्णय तिने घेतला आहे. सिंघम सिनेमातून अजय देवगणसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या काजलचे बॉलिवूडमध्येही अनेक चाहते आहेत. जवळपास दोन वर्षांपासून चाहते तिला लग्नाबद्दल विचारत होते. काजलने याआधीच स्पष्ट केलं होतं की ती ज्या मुलाशी लग्न करेल तो सिनेसृष्टीतील नसेल. तिला कोणत्याही अभिनेता, दिग्दर्शक किंवा निर्मात्याशी लग्न करायचं नाही.
   
  View this post on Instagram
   

  #popsandme

  A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

  'मगधीरा' फेम अभिनेत्री काजलने दक्षिणेतील जवळपास सर्व सुपरस्टार अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. पण तरीही तिच्या अफेअरची चर्चा कधीच झाली नाही. याबद्दल बोलताना काजल म्हणाली की, करिअरच्या सुरुवातीला तिचं एक अफेअर होतं. पण तो सिनेसृष्टीतील नव्हता. हळूहळू काम वाढू लागल्यामुळे दोघांमध्ये अंतर आलं आणि दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. यानंतर काजलने आपल्या कामाकडेच पूर्ण लक्ष दिलं. काजलने हे स्पष्ट केलं आहे की 2020 मध्ये ती लग्न करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, काजलचा होणारा नवरा हा एक व्यावसायिक आहे. या मुलाची पसंत काजलच्या आई- बाबांनी केली आहे. काजलने अनेकदा तिच्या नवऱ्यासाठीच्या अपेक्षा सांगताना हे स्पष्ट केलं आहे की तिचा होणारा नवरा हा काळजी घेणारा, आध्यात्मिक आणि पझेसिव्ह असावा. नेमकी या सर्व गोष्टी त्या मुलामध्ये दिसल्यानेच काजलने त्याला लग्नासाठी होकार दिला.
   
  View this post on Instagram
   

  A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

  काजल अग्रवालच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती दोन दाक्षिणात्य सिनेमांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. काजल लवकरच  'इंडियन 2' आणि 'मुंबई सागा' या सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी तिने दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील बिग स्टार रजनीकांत, चिरंजीवी, वैंकटेश, नागार्जुन, महेश बाबू, रवि तेजा, प्रभास, जूनियर एनटीआर, राम चरण यांच्यासोबत काम केलं आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचं WhatsApp अकाउंट झालं हॅक, हॅकर करतोय अश्लील व्हिडीओ दिल्लीच्या प्रदूषणावर प्रियांका चोप्राची रिअॅक्शन,'इथं राहणं म्हणजे...' Happy Birthday Tabu: तब्बू अजूनही आहे सिंगल, जाणून घ्या लग्न न करण्याचं कारण
  Published by:Madhura Nerurkar
  First published: