मुंबई, 05 जुलै- एकीकडे बॉलिवूडकर Bottlecapchallenge मनापासून करत आपला फिटनेस दाखवत आहेत. तर दुसरीकडे असेही काही कलाकार आहेत जे या चॅलेंजमार्फत स्वतःची क्रिएटीव्ही दाखवत धम्माल उडवत आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता कुणाल खेमू. अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, विद्युत जामवाल यांसारखे फिटनेस क्रेझी कलाकार वेगवेगळ्या प्रकारे Bottlecapchallenge पूर्ण करत आहेत. पण कुणालने मात्र एक वेगळाच पर्याय निवडला आहे. आता तो फिटनेस क्रेझी नाही का असाही प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण तसं काही नाही. कुणाल आपल्या आरोग्याबाबद नेहमीच सजग असतो. अनेकदा तो वर्कआऊट करतानाचे फोटो आणि व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असतो. पण आता त्याने असा एक भन्नाट व्हिडिओ शेअर केला जो पाहून तुमचं हसू थांबणार नाही. एकीकडे विद्युत जामवाल एका किकने तीन बाटल्यांवरची झाकणं उघडतो तर दुसरीकडे कुणाल बरोबर त्याच्या उलटच करतो. त्याने नक्की काय केलं हे तुम्हीच पाहा..
नेमकी असाच गमतीशीर व्हिडिओ मराठी स्टार स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर आणि अमृता खानविलकर यांनी केला आहे. स्वप्नीलने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे चॅलेंज करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या समोर एक बाटली आहे. चॅलेंज सुरू करण्यापूर्वी तो नमस्कार करून किक मारण्याच्या तयारीत असतोच.. पण तोवर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर तिथे येतो आणि ती बाटली उचलून त्यातील पाणी पितो. एवढंच नाही तर सिद्धार्थ त्याला पाणी पिण्यासाठी ती बाटलीही देऊ करतो. मात्र स्वप्नीलचा रागीट चेहरा पाहून आपण त्याचं चॅलेंज पूर्णपणे बिघडवलं याची जाणीव सिद्धार्थला होते. मग काय हळूच बाटली खाली ठेवून सिद्धार्थ तिकडून पळ काढतो आणि स्वप्नीलही त्याच्या मागे जातो.
फक्त या दोघांनीच #Bottlecapchallenge घेतलं असं नाही, तर जिवलगा मालिकेतील काव्या अर्थात अमृता खानविलकरनेही हे चॅलेंज स्वीकारलं. अमृताने स्वतःचा व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, ‘फक्त मुलांनीच हे चॅलेंज का करावं.’ असं म्हणतं अमृताने तिच्या साडीच्या पदराने बाटलीचं झाकण उघडलं.या दोन्ही व्हिडिओला नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
Bottlecapchallenge जे बॉलिवूडकरांना जमलं नाही ते स्वप्नील- अमृताने करून दाखवलं अभिनेता विद्युत जामवालनं असं पूर्ण केलं #Bottlecapchallenge, पाहा व्हिडिओ प्रभासच्या Saaho मध्ये सलमान खानची फेवरेट अभिनेत्री करणार आयटम साँग विराट- अनुष्काची इंग्लंड वारी, व्हायरल होतायेत PHOTO VIDEO:आदेश बांदेकरांनी घेतलं माऊलीचं दर्शन, टाळ-मृदंगात केला हरिनामाचा गजर

)







