जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / जे बॉलिवूडकरांना जमलं नाही ते स्वप्नील- अमृताने करून दाखवलं, Bottlecapchallenge चा व्हिडिओ पाहाच

जे बॉलिवूडकरांना जमलं नाही ते स्वप्नील- अमृताने करून दाखवलं, Bottlecapchallenge चा व्हिडिओ पाहाच

जे बॉलिवूडकरांना जमलं नाही ते स्वप्नील- अमृताने करून दाखवलं, Bottlecapchallenge चा व्हिडिओ पाहाच

स्वप्नीलच्या या पोस्टवर अभिनेता प्रियदर्शन जाधवने कमेंट केली की, ‘हे तर बॉटल कॅप चॅलेंजपेक्षाही जास्त चॅलेंजिंग आहे.’

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 05 जुलै- सध्या बॉलिवूडमध्ये #Bottlecapchallenge चं क्रेझ पाहायला मिळत आहे. अभिनेता अक्षय कुमारने याचा पहिला व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर सिद्धार्थ मल्होत्रा, टायगर श्रॉफ यांसारख्या अनेक अभिनेत्यांनी हे चॅलेंज पूर्ण केलं. दरम्यान या चॅलेंजमध्ये मराठी सिनेसृष्टी तरी कशी काय मागे राहील. स्वप्नील जोशीनेही आता #Bottlecapchallenge स्वीकारलं. पण त्याचं हे चॅलेंज थोडं वेगळं होतं. स्वप्नीलने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हे चॅलेंज करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या समोर एक बाटली आहे. चॅलेंज सुरू करण्यापूर्वी तो नमस्कार करून किक मारण्याच्या तयारीत असतोच.. पण तोवर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर तिथे येतो आणि ती बाटली उचलून त्यातील पाणी पितो. एवढंच नाही तर सिद्धार्थ त्याला पाणी पिण्यासाठी ती बाटलीही देऊ करतो. मात्र स्वप्नीलचा रागीट चेहरा पाहून आपण त्याचं चॅलेंज पूर्णपणे बिघडवलं याची जाणीव सिद्धार्थला होते.

जाहिरात

मग काय हळूच बाटली खाली ठेवून सिद्धार्थ तिकडून पळ काढतो आणि स्वप्नीलही त्याच्या मागे जातो. स्वप्नीलच्या या पोस्टवर अभिनेता प्रियदर्शन जाधवने कमेंट केली की, ‘हे तर बॉटल कॅप चॅलेंजपेक्षाही जास्त चॅलेंजिंग आहे.’ दोघांचा हा काही सेकंदांचा व्हिडिओ एवढा मजेशीर आहे की, हा व्हिडिओ पाहून प्रत्येकजण पोट धरून हसत आहेत. सिद्धार्थ- स्वप्नीलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरलही होत आहे.

फक्त या दोघांनीच #Bottlecapchallenge घेतलं असं नाही, तर जिवलगा मालिकेतील काव्या अर्थात अमृता खानविलकरनेही हे चॅलेंज स्वीकारलं. अमृताने स्वतःचा व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, ‘फक्त मुलांनीच हे चॅलेंज का करावं.’ असं म्हणतं अमृताने तिच्या साडीच्या पदराने बाटलीचं झाकण उघडलं.या दोन्ही व्हिडिओला नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. गणेश नावाच्या एका युझरने लिहिले की, ‘ती एक स्त्री आहे ती काहीही करू शकते.’ प्रभासच्या Saaho मध्ये सलमान खानची फेवरेट अभिनेत्री करणार आयटम साँग विराट- अनुष्काची इंग्लंड वारी, व्हायरल होतायेत PHOTO …म्हणून मुलीची इच्छा असूनही संजय दत्तने तिला अभिनेत्री होऊ दिले नाही VIDEO:आदेश बांदेकरांनी घेतलं माऊलीचं दर्शन, टाळ-मृदंगात केला हरिनामाचा गजर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात