विराट- अनुष्काची इंग्लंड वारी, व्हायरल होतायेत PHOTO

अनुष्का सध्या विराटसोबत इंग्लंडमध्ये वेळ घालवत आहे. दोघांचे इंग्लंडमध्ये फिरतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

  • Share this:

विराट कोहलीच्या आयुष्यातला हा सर्वोत्तम काळ सुरू आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत भारताचा प्रवेश निश्चित झाला आहे.

व्यावसायिक पातळीवर त्याला यश मिळत आहे तर खासगी आयुष्यात त्याला पत्नी अनुष्का शर्माची योग्य साथही मिळत आहे. अनुष्का सध्या विराटसोबत इंग्लंडमध्ये वेळ घालवत आहे. दोघांचे इंग्लंडमध्ये फिरतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. स्वतः विराट आणि अनुष्काने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले.

अनुष्काने फोटो शेअर करताना, ‘कधी कधी निरर्थक क्षणांचाही आनंद घ्या.’ या फोटोत विरुष्का एकत्र उभे आहेत. अनुष्काचा हात विराटच्या खांद्यावर आहे तर विराट तिच्याकडे तोंड वेडावून पाहत आहे. त्याच्या याच हावभावांकडे पाहून अनुष्काला आपलं हसू आवरत नाही.

विराटने शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघंजण एका फ्रेमच्या बाजूला उभे आहेत. त्या फ्रेमच्या एका बाजूला मिस्टर आणि दुसऱ्या बाजूला मिसेस असं लिहिलं आहे. या फोटोमध्ये दोघंही फार आनंदी दिसत आहेत. आतापर्यंत या फोटोला 40 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

सध्या विराट वर्ल्ड कपमध्ये व्यग्र आहे तर अनुष्का भारतीय संघाचे सामने पाहण्यासाठी इंग्लंडमध्ये गेली आहे. सामना संपल्यानंतर विरुष्का दोघं एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात.

विराट आणि अनुष्काने डिसेंबर 2017 मध्ये लग्न केलं होतं. दोघांची पहिली भेट एका जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. यानंतर दोघांत मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं ते त्यांना कळलंच नाही. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी अखेर लग्न केलं.

सध्या अनुष्काने कामामधून ब्रेक घेतला आहे. मात्र हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अनुष्का म्हणाली की, आता ती अशा स्थानावर आहे जिथे तिला पैशांसाठी सिनेमात काम करण्याची गरज नाही. गेल्या एका वर्षात तीन सिनेमे केले. त्यामुळे आता थोडा आराम हवा आहे. गेल्या वर्षी अनुष्काचे परी, सुई धागा आणि झीरो हे तीन सिनेमे प्रदर्शित झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2019 02:52 PM IST

ताज्या बातम्या