मुंबई, 05 जुलै- गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या रेस ३ सिनेमानंतर जॅकलिन फर्नांडीस कोणत्यास सिनेमात दिसली नाही. पण आता तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच जॅकलीन साहो सिनेमात आयटम साँगवर थिरकताना दिसणार आहे. या गाण्यात जॅकलीन, प्रभाससोबत आपल्या मादक अदांनी चाहत्यांचं मन जिंकायला सज्ज झाली आहे. प्रभास आणि जॅकलिनचं हे आयटम साँग चक्क ऑस्ट्रेलियामध्ये चित्रीत करण्यात आलं आहे. तर बादशहाने हे गाणं गायलं आहे. साहो हा एक अॅक्शनपट आहे. सिनेमात प्रभाससोबत श्रद्धा कपूरची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. नुकतंच या सिनेमातील पहिलं द सायको सैंया गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला. अवघ्या काही तासांमध्ये हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. अवघ्या २८ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये श्रद्धा आणि प्रभास गाण्यावर थिरकताना दिसत आहे. 8 जुलैला पूर्ण गाणं सोशल मीडियावर शेअर करण्यात येणार आहे. …म्हणून मुलीची इच्छा असूनही संजय दत्तने तिला अभिनेत्री होऊ दिले नाही गाण्याची झलक पाहून असं वाटतं की साहो सिनेमातलं हे द सायको सैयां गाणं लोकांना थिरकायला लावेलच. या लुकमध्ये प्रभासने काळ्या रंगाचं टी-शर्ट आणि जॅकेट घातलं आहे. तर श्रद्धाने शॉर्ट ग्लिटरी ड्रेस घातला आहे. बहुप्रतिक्षीत साहो सिनेमात सुपरस्टार प्रभास अफलातून अक्शन सीन करताना दिसणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर या सिनेमातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. साहो सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला होता. प्रभास आणि श्रद्धा कपूर यांची प्रमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाच्या 1 मिनिटं आणि 39 सेकंदाच्या टीझरमध्ये प्रभास अॅक्शन अवतारात दिसत असून श्रद्धा कपूरसोबत संवाद वगळता यामध्ये संपूर्ण टीझरमध्ये प्रभास सिनेमातील खलनायकांशी दोन हात करताना दिसत आहे. चंकी पांडे, नील नितीन मुकेश आणि जॅकी श्रॉफ असे तीन खलनायक या टीझरमध्ये पाहायला मिळतात. याशिवाय अॅक्शन सोबतच या टीझरमध्ये थ्रीलर, रोमान्स आणि इमोशन्स यांचं मिश्रण पाहायला मिळत आहे. Nach Baliye 9 मध्ये असणार हे स्पर्धक, पाहा संपूर्ण लिस्ट
अभिनेत्री श्रद्धा कपूर सुद्धा या सिनेमामध्ये स्टंट सीन करताना दिसणार आहे. साहो सिनेमात प्रभास आणि श्रद्धा कपूरशिवाय नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर, चंकी पांडे, अरुण विजय आणि मुरली शर्मा यांसारखे तगडे कलाकार असणार आहेत. साहो हा एक अक्शन थ्रिलर सिनेमा असून येत्या 15 ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. प्रभासच्या या बहुप्रतिक्षीत सिनेमासोबत अक्षय कुमारचा मिशन मंगल आणि जॉन अब्राहमचा बटला हाउस सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. प्रेग्नंट समीरा रेड्डीने नवव्या महिन्यात पाण्यात केलं फोटोशूट VIDEO:आदेश बांदेकरांनी घेतलं माऊलीचं दर्शन, टाळ-मृदंगात केला हरिनामाचा गजर

)







