मुंबई, 5 जुलै : सध्या बॉलिवूडमध्ये #Bottlecapchallenge क्रेझ आहे. अभिनेता अक्षय कुमार पाठोपाठ सिद्धार्थ मल्होत्रा आणि टायगर श्रॉफनं सुद्धा हे चॅलेंज पूर्ण केलं. त्यानंतर फिटनेस फ्रिक अभिनेता विद्युत जामवालनं थोड्या हटके पद्धतीनं हे चॅलेंज पूर्ण केलं. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. एकीकडे अक्षयनं ओरिजिनल स्टाइलमध्ये, टायगरनं डोळ्यावर पट्टी बांधून हे चॅलेज पूर्ण केलं तर विद्युतनं एक दोन नाही तर चक्क तीन बॉटल्स घेऊन हे चॅलेंज पूर्ण केलं. हा व्हिडिओ विद्युतनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंवर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे. यावरून विद्युतचा हा अनोखा अंदाज चाहत्यांना खूप आवडला असल्याचं लक्षात येतं.
...म्हणून मुलीची इच्छा असूनही संजय दत्तने तिला अभिनेत्री होऊ दिले नाही
विद्युत जामवालनं केरळच्या सर्वात प्राचीन मार्शल आर्ट फॉर्ममधून मार्शल आर्टचे धडे घेतले आहेत. तर टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार सुद्धा त्यांच्या फिटनेससाठी ओळखले जातात. हॉलिवूड स्टार इरोलसन ह्यूजनं या चॅलेंजची सुरुवात केली. त्यानंतर त्यानं जेसन स्टेथमला हे चॅलेंज दिलं. याशिवाय हॉलिवूड स्टार जॉन मेयरनं सुद्धा या चॅलेंजचा व्हिडिओ शेअर केला आहे. हॉलिवूड नंतर आता बॉलिवूडमध्ये या चॅलेंजची क्रेझ वाढत आहे.
Bigg Boss Marathi 2- सई असेल दुसरी वाइल्ड कार्ड एण्ट्री?
बॉलिवूडमध्ये सर्वात अगोदर अक्षय कुमारनं हे #Bottlecapchallenge पूर्ण केलं. त्यानंतर टायगर श्रॉफ आणि सिद्धार्थ मल्होत्रानं या चॅलेंजचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले. 2018 मध्ये आलेल्या किकी चॅलेंज नंतर आता आलेल्या या बॉटलकॅप चॅलेंजनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या चॅलेंजमध्ये पायाच्या सहाय्यानं बॉटलचं झाकण काढायचं असतं. यामध्ये योग्य समतोल आणि फिटनेस खूप महत्त्वाचा असतो. विद्युतच्या सिनेमाविषयी बोलायचं तर तो काही दिवसांपूर्वी ‘जंगली’मध्ये दिसला होता. त्याच्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर जेमतेम कमाई केली होती.
संजय दत्तच्या मुलीच्या बॉयफ्रेंडचं निधन, त्रिशाला दत्तने शेअर केली भावुक पोस्ट
====================================================================
SPECIAL REPORT: 'वामन हरी पेठे'मधून 58 किलो सोनं मॅनेजरनेच केले लंपास!