जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Katrina-Vicky Wedding: मुलगी वामिकाला सोडून अनुष्का-विराट लग्नात होणार का सहभागी?

Katrina-Vicky Wedding: मुलगी वामिकाला सोडून अनुष्का-विराट लग्नात होणार का सहभागी?

Katrina-Vicky Wedding:  मुलगी वामिकाला सोडून अनुष्का-विराट लग्नात होणार का सहभागी?

कतरिना आणि विकीच्या लग्नाला अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि तिचा पती आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीही (Virat Kohli) या लग्नाला हजर राहणार असल्याची चर्चा आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 09 डिसेंबर - Katrina Kaif Vicky Kaushal Wedding: कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशलच्या (Vicky Kaushal) लग्नाला अनेक सिनेतारकांनी हजेरी लावली आहे. या लग्नाला बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि तिचा पती आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीही (Virat Kohli) या लग्नाला हजर राहणार असल्याची चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट आणि अनुष्का देखील कतरिना-विक्कीच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत. विरुष्का इतर कार्यक्रम सोडून या लग्नात सहभागी होणार आहेत. लग्नाच्या ठिकाणा बाहेर उभे असलेले पापाराझी टाळण्यासाठी हे जोडपे आपली मुलगी वामिकाला सोबत घेऊन जाणार नाहीत. भारतातील ओमिक्रॉन व्हायरसमुळे त्यांनी आपल्या मुलीला दूर ठेवण्याचा निर्णयही घेतला आहे. वाचा :  फायनली स्वीटू येणार नांदायला तेही ओमच्या घरी; लग्नाचा video व्हायरल कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाचे विधी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे सुरू झाले आहेत. विकी आणि कतरिना दोघेही 9 डिसेंबरला याच किल्ल्यात लग्न करणार आहेत. 7 डिसेंबर रोजी मेहंदी आणि संगीत विधी पूर्ण झाले, तर आज (8 डिसेंबर) हळदीचा विधी पार पडला. वाचा :  तुम्हालाही पाहता येणार कतरिना-विकीचा लग्नसमारंभ; जाणून घ्या कसं सिक्स सेन्स बरवाडा फोर्ट हॉटेलमध्ये आयोजित या हळदी समारंभात विकी आणि कतरिनाला कुटुंबीयांनी हळद लावली. त्याचबरोबर हळदी समारंभानंतरच्या जेवणात देशी-विदेशी अशा 30 प्रकारच्या पदार्थांचा समावेश करण्यात आला होता. कतरिना आणि विकीचा हा विवाहसोहळा पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आला आहे आणि त्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्थाही करण्यात आली आहे.  हनीमून पर जाने से पहले दोनों मुंबई के होटल ताज लैंड्स एंड (Taj Lands End) में इंडस्ट्री के दोस्तों के लिए एक रिसेप्शन पार्टी करेंगे. हालांकि अभी कोई तारीख सामने नहीं आई है. फाइल फोटो. हॉटेलच्या आत आणि बाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक राजेश सिंह यांच्या आदेशामुळे हॉटेल सिक्स सेन्सच्या बाहेरील रस्त्यावर 25 पोलिसांची ड्युटी लावण्यात आली असून, ते 10 तारखेला रात्री 8 वाजेपर्यंत येथे तैनात राहणार आहेत.  माना जा रहा है कि रिसेप्शन इंडस्ट्री के वो सभी लोग शामिल होंगे, जिसको विक्की और कैटरीना शादी में नहीं बुला पाए हैं. विक्की और कैटरीना की शादी में सिर्फ 120 लोग शामिल होने हैं. फोटो साभारः Instagram @katrinakaif/vickykaushal09 रिपोर्टनुसार, विकी आणि कतरिनाच्या लग्नाचा व्हिडिओ 2022 मध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाईल. यामध्ये त्यांच्या साखरपुड्यापासून राजस्थानमधील लग्नाचे सर्व विधी दाखवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, 2019 मध्ये, प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी त्यांच्या लग्नासाठी OTT प्लॅटफॉर्मवर एक करार देखील केला होता.विकी आणि कतरिनाच्या लग्नाला 120 पाहुणे येणार आहेत. सवाई माधोपूरच्या सिक्स सेन्स किल्ले बरवाडामध्ये लग्नाचे सर्व कार्यक्रम सुरू आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात