मुंबई, 8 डिसेंबर : झी मराठी वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' (yeu kashi tashi mi nandayala) ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील स्वीटू आणि ओमची (om and sweetu ) जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. मालिका आता एक विशिष्ट वळणावर पोहचली आहे. स्वीटूला ओमच सत्य समजले आहे. तर स्वीटू मोहितपासून देखील वेगळी झाली आहे. आता या सगळ्या ट्वीस्टनंतर मालिका लवकरच (yeu kashi tashi mi nandayala taking leap) लीप घेणार आहे. सर्वांना ज्याची अतुरता होती ते या लीप नंतर पाहायला मिळणार आहे. आता फायनली स्वीटू आणि ओमची अधुरी प्रेम कहाणी पूर्ण होणार आहे. विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. स्वीटूचा नवरी लुक (om and sweetu marriage) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
झी मराठीने नुकताच येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील फायनल ट्वीस्टचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मालिकेने लीप घेतल्याचे दिसत आहे. कारण ओम त्याचं गेलेल घर, प्रापर्टी परत मिळवली आहे. त्याने लंडन ते इंडिया असा प्रवास केला आहे. आता तो फायनली स्वीटूला भेटायला तिच्या कोकणात गावी जाणार आहे आणि याचा देखील व्हिडिओ समोर आला आहे. गावी झाल्यानंतर ओम स्वीटूसमोर कसं प्रेम व्यक्त करणार व या दोघांच लग्न कसं होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
View this post on Instagram
प्रेक्षकांना याची देखील उत्सुकता लागली आहे की, लग्नानंतर पुढे काय होणार. यासोबतच मालविकाच काय झाले. ती बदलली आहे का पहिल्यासारखीच आहे. काहींना तर असा देखील प्रश्न सतावत आहे की, स्वीटू आणि ओमच्या लग्नानंतर मालिका संपणार. पण या दोघांनी दिलेल्या एका मुलाखतीत तर असं समोर आलं आहे की या दोघांच्या लग्नानंतरच मालिकेत मोठा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार ते येणाऱ्या भागातच समजणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials, Zee marathi serial