Home /News /entertainment /

अभिनेता अजय देवगणचा मोठा निर्णय, गलवान खोऱ्यातील शहीद जवानांवर बनवणार सिनेमा

अभिनेता अजय देवगणचा मोठा निर्णय, गलवान खोऱ्यातील शहीद जवानांवर बनवणार सिनेमा

बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अजय देवगण लवकरच लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये भारतीय सैन्यावर चिनी सैनिकांकडून झालेल्या हल्ल्याची घोषणाा करण्याच्या तयारीत आहे

    मुंबई, 04 जुलै : बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अजय देवगण लवकरच लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये भारतीय सैन्यावर चिनी सैनिकांकडून झालेल्या हल्ल्याची घोषणाा करण्याच्या तयारीत आहे. चित्रपटामध्ये त्या 20 जवानांची कहाणी असणार आहे, जे चिनी सैन्याचा सामना करताना शहीद झाले होते. याबाबत अद्याप स्पष्टता नाही आहे की, या सिनेमामध्ये अजय देवगण स्वत: काम करणार आहे की नाही. सिनेमामध्ये काम करणारे कलाकार आणि इतक क्रू अद्याप निश्चित करणे बाकी आहे. या सिनेमाचे सहनिर्माते अजय देवगण फिल्म्स (Ajay Devgn Films) आणि सिलेक्ट मीडिया होल्डिंग्ज एलएलपी (Select Media Holdings LLP) असणार आहेत. पूर्व लडाख याठिकाणी असणाऱ्या गलवान खोऱ्यामध्ये 15 जून रोजी चिनी सैन्याविरुद्ध भारतीय सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली. यामध्ये भारताच्या 20 जवानांना वीरगती प्राप्त झाली. 1975 नंतर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराला झालेली ही पहिली दुर्घटना होती, जेव्हा अरुणाचल प्रदेशात भारतीय सैन्यावर चिनी सैन्याने हल्ला केला होता. (हे वाचा-सोनू निगमच्या 'त्या' वक्तव्यावर भडकला मिका सिंग, भूषण कुमारचे केले समर्थन) अजय देवगणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर लवकरच त्याचा भूज : The Pride of India हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अजय बरोबरच संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, अॅमी विर्क आणि शरद केळकर ही तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. अभिषेक दुधैयाने या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. (हे वाचा-'मनात आला होता आत्महत्येचा विचार पण...','आऊटसायडर' असणाऱ्या मनोज वाजपेयीची कहाणी) (हे वाचा-लॉकडाऊनमध्ये केलं Virtual फोटोशूट, मराठमोळ्या अभिनेत्रींनी दिला स्वदेशीचा नारा) संपादन - जान्हवी भाटकर
    First published:

    Tags: Ajay devgan, China, Martyred

    पुढील बातम्या