Home /News /entertainment /

सोनू निगमच्या 'त्या' वक्तव्यावर भडकला मिका सिंग, भूषण कुमारचे केले समर्थन

सोनू निगमच्या 'त्या' वक्तव्यावर भडकला मिका सिंग, भूषण कुमारचे केले समर्थन

बॉलिवूडमध्ये सध्या सुरू असणाऱ्या नेपोटिझमच्या वादात गायक सोनू निगमने देखील उडी घेतली होती. संगीत क्षेत्रातही नेपोटिझम असल्याची टीका सोनूने केली आहे. मात्र त्यावर संगीत क्षेत्रातूनच विविध प्रतिक्रिया येत आहेत.

    मुंबई, 04 जुलै : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडमध्ये नेपोटिझम (Nepotism) या विषयावरून रोज नवे वादंग होत आहेत. या वादामध्ये काही दिवसांपूर्वी गायक सोनू निगमने (Sonu Nigam) देखील उडी घेतली होती. त्याने असे म्हटले होते की, अशाप्रकारची बातमी काही दिवसात संगीत क्षेत्रातून देखील येऊ शकते. सोनूने संगीत क्षेत्रातील नेपोटिझमवर भाष्य करत भूषण कुमारवर (Bhushan Kumar) गंभीर आरोप केले होते. त्यानंतर भूषण कुमारची पत्नी दिव्या खोसला कुमारने (Divya Khosla Kumar) व्हिडीओ जारी करून सोनू निगमवर टीका केली होती. सोनू निगमच्या संगीत क्षेत्रातील माफिया वक्तव्यवर गायक मिका सिंग (Mika Singh) देखील नाराज आहे. त्याने भूषण कुमारचे समर्थन करत सोनू निगमला खडे बोल सुनावले आहेत. (हे वाचा-'मनात आला होता आत्महत्येचा विचार पण...','आऊटसायडर' असणाऱ्या मनोज वाजपेयीची कहाणी) सोनू निगमच्या या वक्तव्यानंतर संगीत क्षेत्र दोन गटांमध्ये विभागले गेले आहे. काहींनी सोनू निगमला पाठिंबा दर्शवला आहे तर काही असेही आहेत जे भूषण कुमारवर करण्यात आलेल्या आरोपांना चुकीचे सांगत आहेत. यावर मिकासिंगने अशी प्रतिक्रिया दिली आहे की, संगीत क्षेत्र काम करण्यासाठी एक सुंदर जागा आहे, आणि त्याचा सन्मान करणे गरजेचे आहे. बॉलिवूड लाइफने दिलेल्या बातमीनुसार मिका सिंगने अशी प्रतिक्रिया दिली आहे की, 'गेल्या काही काळात काही नवीन गायक इंडस्ट्रीमध्ये आले आणि त्यांनी त्यांच्या आवाजावर इंडस्ट्रीमध्ये नाव कमावले. सोनू निगम असे म्हणत आहेत की त्यांना कुणी गाणी देत नाहीत, पण आता नव्यान आलेल्या गायकांनी मोठी लोकप्रियता कमावली आहेच. यामध्ये अरिजित सिंह, अरमान मलिक आणि बी प्राक सारखे गायक आहेत. त्याशिवाय पंजाबी संगीत इंडस्ट्रीमधून देखील नवे टॅलेंट बाहेर येत आहे. आता बी प्राक कोणत्याही बड्या आसामीचा मुलगा नाही आहे. अनेक लोकांचे नाव होत आहे आणि त्यातील बऱ्याच लोकांना भूषण कुमारने ब्रेक दिला आहे. कोणतेही म्यूझिक लेबल तुम्हाला केवळ ब्रेक देऊ शकते. त्यानंतर तुमचे आणि तुमच्या गाण्याचे काय होते याच्याशी त्या म्यूझिक लेबलचा काही संबंध नसतो.' (हे वाचा-गॅलरीतून दिसते अर्धी मुंबई! पाहा कतरिनाच्या घराचे INSIDE PHOTOS) मिका पुढे असं म्हणाला की, 'मला फिल्ममेकर संजय गुप्ताने शूटआउट अॅट लोखंडवाला या चित्रपटातून ब्रेक दिला. आपली इंडस्ट्री काम करण्याच्या दृष्टीने खूप चांगली आहे आणि त्याचा आपण सन्मान करणे आवश्यक आहे.' संपादन - जान्हवी भाटकर
    First published:

    Tags: Singer mika singh, Sonu nigam, Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या