Bigg Boss Marahi 2- आपण कितीही केलं तरी यांचीच नावं पुढे- सुरेखा पुणेकर

Bigg Boss Marahi 2- आपण कितीही केलं तरी यांचीच नावं पुढे- सुरेखा पुणेकर

घरात प्रत्येकालाच काहीना काही समस्या आहेत. इतरांचं वागणं खटकतं आणि त्यावर भांडणं होतात. आरोप प्रत्यारोप होत असतात.

  • Share this:

मुंबई, 05 जुलै- बिग बॉस मराठीच्या घरात प्रत्येकालाच काहीना काही समस्या आहेत. इतरांचं वागणं खटकतं आणि त्यावर भांडणं होतात. आरोप प्रत्यारोप होत असतात. कधी कधी या सगळ्या गोष्टी इतक्या असह्य होतात आणि कोणाकडे तरी मनमोकळ करण्याची इच्छा होते. बऱ्याचदा सदस्य त्यांच्या आवडत्या व्यक्तीकडे या गोष्टी बोलून दाखवतात. तर कधी कॅमेरासमोर बोलून मन हलकं करतात. आता असचं काहीसं सुरेखाताईंनाही वाटू लागलं आहे. सुरेखा ताईंनी त्यांचं मन अभिजीत आणि शिवकडे मोकळ केलं.

त्याचं झालं असं की वीणा आणि शिवला दिलेल्या टास्कमध्ये सुरेखा ताईंनी त्यांच्यासाठी गाणं गायलं होतं.  ते गाणं प्रेक्षकांना खूप आवडेल पण यांची खूप जळायला लागली आहे. त्यात आता वीणा आणि त्यांचं मोठं भांडण होईल असं त्यांना वाटतंय. त्यावर अभिजीत म्हणाला, ‘आता भांडायचे. तोंडावर सांगायचे जे काही केले ते.’ सुरेखाताई पुढे म्हणाल्या की, ‘मी मला जे वाटते ते कॅमेराला सांगणार होते पण तुम्हाला पाहिल्यावर वाटलं की तुमच्याकडे मन मोकळं करावं, म्हणून मी तुमच्याजवळ आले.’

Bottlecapchallenge जे बॉलिवूडकरांना जमलं नाही ते स्वप्नील- अमृताने करून दाखवलं

सुरेखाताईंना शिव आणि अभिजीत बरोबर बोलत असताना अश्रू अनावर झाले. खूप वाईट वाटतं आज कालच्या मुली इतक्या हुशार कशा होऊ शकतात.. आम्हांला नाही का हुशारी.. पण आपण म्हणतो जाऊ दे पोरी आहेत. रात्रीपासून सगळं काम मी केलं, संपूर्ण स्वयंपाक मी केला. तांदूळ वाटायचे होते ते पण किशोरीला आले नाही, त्या रुपालीनं करून दिलं आपण कितीही केलं तरी यांचीच नावं पुढे येणार.

दरम्यान, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दोन नावं खूप चर्चेत आहेत ती म्हणजे वीणा आणि शिव. कालच्या साप्ताहीक टास्कमध्ये या दोघांनाही सुंदर डान्स सादर केला. परंतु शर्मिष्ठा, पुष्कर, सई आणि स्मिता यांनी खोटं भांडण झाल्याचा आव आणला. यानुसार शर्मिष्ठाने तिला पोहे खायचे असल्याचं सांगितलं तर पुष्कर आणि सईला डान्स पाहायचा होता. शेवटी शर्मिष्ठाने डान्स करत करत पोहे करण्यास सांगितलं. त्यानुसार सुरेखा ताईंनी गाणं म्हंटलं आणि पोहे करता करताच शिव आणि वीणाने सुंदर डान्स सादर केला. जो घरात आलेल्या पाहुण्यांना देखील आवडला. यासाठी त्यांनी एक स्टार देखील दिला. परंतु हे करत असतानाच पोहे मात्र बिघडले.

स्वप्नील- अमृताच्या पावलांवर पाऊल ठेवत कुणालने केलं धम्माल Bottlecapchallenge

यावर उपाय म्हणून वीणाने पुन्हा चविष्ट पोहे खास शर्मिष्ठासाठी केले. घरामध्ये आलेले पाहुणे सदस्यांना त्रास देण्याचा भरपूर प्रयत्न करत आहेत. पण कोणताच सदस्य चिडत नाही आणि उलट उत्तरही देत नाहीये. काल घरातील स्पर्धकांना याची खात्री पटली की, पाहुणेच आपल्याला त्रास देण्यासाठी काहीना काही घटना घडवून आणत आहेत. यावर अभिजीत म्हणाला की, सूप मध्ये केस येणं, बेडवर माश्या सापडणं, हे सगळं तेच करत आहेत. आता पाहुणे स्पर्धकांना आज कोणते टास्क देणार हे पाहणं रंजक असणार आहे.

विराट- अनुष्काची इंग्लंड वारी, व्हायरल होतायेत PHOTO

VIDEO:आदेश बांदेकरांनी घेतलं माऊलीचं दर्शन, टाळ-मृदंगात केला हरिनामाचा गजर

First published: July 5, 2019, 5:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading