नवी दिल्ली, 26 जून- तमिळ बिग बॉसचं तिसरं पर्व सध्या सुरू आहे.शोची सुरुवात जरी दणक्यात झाली असली तरी आता हा शो वादात अडकला आहे. याचं मुख्य कारण आहेत ते म्हणजे थलायवा रजनीकांत. दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांचा घरातील फोटो हटवल्यामुळे हा वाद सुरू झाला आहे. त्याचं झालं असं की सुरुवातीला या घरात रजनीकांत यांचा एक फोटो होता मात्र आता तो फोटो घरात दिसत नाही. याबद्दल एका पत्रकाराने ट्वीट करत म्हटलं की, ‘गेल्या आठवड्यात मी बिग बॉसच्या घरी गेलो होतो. तेव्हा मला भिंतीवर रजनीकांत यांचा फोटो दिसला नाही.’
VIDEO: रितेश देशमुखने सांगितलं त्याच्या सुखी संसाराचं रहस्य
आता रजनीकांत यांचं नाव आलं आणि ती बातमी झाली नाही असं तर होऊच शकत नाही. या प्रकरणातही असंच काहीसं झालं. अगदी काही तासांमध्ये हे ट्वीट व्हायरल झालं आणि लोकांनी बिग बॉसच्या निर्मात्यांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली. आता सोशल मीडियावर युझर्स वाहिनीवर टीका करत आहेत.
तुषार कपूरसोबत भांडण झाल्यावर एकताने बोलावले पोलिसांना
विशेष म्हणजे दिग्दर्शक प्रेमजी यांनीही याबद्दल आपला राग व्यक्त करत म्हटलं की, या कृतीतून लोकांच्या मनातून रजनीकांत जाऊ शकत नाहीत. सोशल मीडियावरील एका युझरने लिहिले की, ‘मला याची कल्पना आहे की देवाची जागा आत त्या घरात नव्हती. त्यामुळे त्याला तिकडून काढण्यात आलं. कारण रजनीकांत यांच्यासाठी उत्तम जागा आमच्या हृदयात आहे.’ AJAY@WATSAPPRAK ने लिहिले की, ‘मला नाही वाटत की थलायवा यांना विजय टीव्हीच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या लोकप्रियतेची गरज आहे. ते या सगळ्यांपेक्षा फार उंचावर आहेत. काही लोकांना आपली जमीन सांभाळता येत नाही. पण रजनीकांत वेगळे आहेत. ते खोटं हसणाऱ्यांपैकी नाही.’
पाकिस्तान कर्णधारासाठी बॉलिवूड आलं एकत्र, सोशल मीडियावर दिल्या प्रतिक्रिया
तर ONLY@SUPERSTAR ने लिहिले की, ‘फोटो हटवण्याचं एक कारण असू शकतं ते म्हणजे तुच्छ मानसिकता. खरं तर त्यांच्या फोटोची तिथे काहीच गरज नाही. ते आमच्या हृदयात सुरक्षित आहेत. त्यांना तिथे कोणी हातही लावू शकत नाहीत.’ बिग बॉस तमिळच्या या तिसऱ्या पर्वात १५ स्पर्धकांची एण्ट्री झाली आहे. पहिल्या आठवड्यात सर्व स्पर्धक सुरक्षित असल्याचं शोचे होस्ट कमल हसन यांनी सांगितलं होतं.
अक्षयचा 'सूर्यवंशी'मधून 2 दिवसांचा ब्रेक, इतर मनोरंजन विश्वातील घडामोडी