Elec-widget

पाकिस्तान कर्णधारासाठी बॉलिवूड आलं एकत्र, सोशल मीडियावर दिल्या प्रतिक्रिया

पाकिस्तान कर्णधारासाठी बॉलिवूड आलं एकत्र, सोशल मीडियावर दिल्या प्रतिक्रिया

sarfraz ahmed सरफराज, तू अगदी बरोबर वागलास पण, त्या माणसाला तुझ्या मुलीसमोर केलेल्या अशा वागणुकीसाठी कानाखाली वाजवली असती तर, मला अधिक चांगलं वाटलं असतं.

  • Share this:

मुंबई, 25 जून- मॅनचेस्टर येथे १६ जून रोजी झालेल्या भारत- पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला. या पराभवानंतर पाकिस्तानच्या संघाला क्रिकेट चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदला सर्वात जास्त ट्रोल केलं गेलं. सोशल मीडियावर एका पाकिस्तानी चाहत्याने व्हिडिओ शेअर करत खेळाडूंवर टीका केली. या सगळ्यात सरफराज आपल्या मुलीसोबत मॉलमध्ये गेला असता त्याला एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या समोर जाऊन मुलीसमोरच शिवीगाळ करायला सुरुवात केली. याच मुद्यावर बॉलिवूडकरांनी आपलं मत मांडलं आहे.  बॉलिवूडकरांनी सरफराजला आपला पाठिंबा दाखवला असून त्या अज्ञात व्यक्तिची ट्विटर वरून चांगली शाळा घेतली.(वाचाः सलमान खानच्या या अभिनेत्रीने गुपचुप केलं लग्न, लग्नाचे फोटो आले समोर)

अभिनेता रितेश देशमुखने ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, 'क्रिकेटच्या इतिहासात अनेक कर्णधारांनी अपयश पाहिलं आहे. पण, सरफराज अहमदसोबत असं व्हायला नको होतं. हे सरळ सरळ शोषण आहे. तो त्याच्या मुलीसोबत होता याचं तरी भान ठेवा.'

याशिवाय टीव्ही अभिनेत्री गौहर खाननेही ट्वीट शेअर करत म्हटलं की, 'केवढा मोठा मुर्ख आहे हा, याचं नाव सांगा आणि त्याला त्याची जागा दाखवा. एक खेळाडू चांगल्या पद्धतीने खेळू शकला नाही तर, याचा अर्थ असा नाही की, त्याच्यासोबत तुम्ही गैरव्यवहार कराल. सरफराज त्याच्या मुलीसोबत होता याची तरी या मुर्ख माणसाला लाज वाटली पाहिजे. त्याच्या आई- वडिलांनी एक कानशिलात लगावली पाहिजे.'

Loading...

टीव्ही अभिनेता जय भानुशालीनेही आपलं मत यावेळी मांडलं. 'लज्जास्पद... सरफराज, तू अगदी बरोबर वागलास पण, त्या माणसाला तुझ्या मुलीसमोर केलेल्या अशा वागणुकीसाठी कानाखाली वाजवली असती तर, मला अधिक चांगलं वाटलं असतं.'

गाडीत बसताना फोटोग्राफर काढत होता दीपिकाचे फोटो, ती म्हणाली, ‘ये आता आत बस...’

बिग बॉस फेम आणि निर्माता विकास गुप्ताने ट्वीट करत म्हटलं की. 'निर्लजपणाचं हे एक उत्तम उदाहरण आहे. एक सामना हरल्यामुळे त्याचा अपमान हे या गोष्टीचा पुरावा आहे की, संबंधीत व्यक्ती किती असंवेदनशील आणि वाईट आहे. कर्णधार सरफराज अहमद त्याच्या मुलीसोबत असतानादेखील अशा प्रकारच्या वागणुकीचं चित्रीकरण करताना त्याच्या चेहऱ्यावर किती अभिमान होता.'

अखेर आपल्या व्हिडिओवर अनेक नकारात्मक प्रतिक्रिया पाहिल्यावर त्या माणसाला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्यानंतर ट्विटरवर त्याने माफी मागतानाचा व्हिडीओ शेअर केला. यात माफी मागताना तो म्हणाला की, ' मला हा व्हिडिओ शेअर करायचा नव्हता. मला कल्पना नाही हा व्हिडीओ कसा अपलोड झाला आणि व्हायरल झाला. झालेल्या प्रकारासाठी मी माफी मागतो.'

The man who abused sarfraz today makes an apology in his new video. Saying sorry to @SarfarazA_54 nd whole nation.👏👏

सलमान खानच्या या अभिनेत्रीने गुपचुप केलं लग्न, लग्नाचे फोटो आले समोर

VIDEO : चंद्रकांत पाटलांचं आता अजित पवार टार्गेट, केला नवा निर्धार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2019 09:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...