मुंबई, 26 जून- बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. बॉलिवूडमधील सर्वात गोड जोडी म्हणून रितेश आणि जेनेलिया देशमुखकडे पाहिलं जातं. सुमारे १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी २०१२ मध्ये लग्न केलं. दोघांना दोन मुलंही आहेत. जेनेलियाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये रितेश त्यांच्या संसार सुखी कसा झाला याचं कारण सांगताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आलं नाही असं होणारच नाही. जेनेलियाने हा व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले की, ‘पत्नी आनंदी. आनंदी आयुष्य.’ व्हिडिओच्या सुरुवातीला रितेश कॅमेऱ्याकडे पाहून म्हणतो की, बायकोला आनंदी ठेवणं हेच सुखी संसाराचा मंत्रा आहे. हे बोलल्यानंतर तो जेनेलियाचे पाय चेपताना दिसतो. तर जेनेलिया आरामात सोफ्यावर बसून कुछ कुछ होता हैचं गाणं गाताना दिसते. दोघांचा हा विनोदी अंदाजच त्यांच्या चाहत्यांना आवडत आहे. तुषार कपूरसोबत भांडण झाल्यावर एकताने बोलावले पोलिसांना
पाकिस्तान कर्णधारासाठी बॉलिवूड आलं एकत्र, सोशल मीडियावर दिल्या प्रतिक्रिया १० वर्षांच्या नात्यानंतर जेनेलिया डिसुजा आणि रितेश देशमुखने ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये मराठी आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. सिनेसृष्टीत दोघांनी एकाच सिनेमातून पदार्पण केलं. पहिल्याच सिनेमाच्यावेळी दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. बॉलिवूडप्रमाणेच रितेश मराठी सिनेमांची निर्मिती करतो. लय भारी, बालक पालक माऊली या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
चाहत्यावर भडकली तापसी पन्नू, म्हणाली- ‘फोन ठेव नाही तर फोडून टाकेन' सिनेसृष्टीत झाली १६ वर्ष मस्ती, हाउसफुल मालामाल विकल, धमाल आणि अपना सपना मनी मनी यांसारख्या सिनेमातून रितेशने सिनेसृष्टीत स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. तुझे मेरी कसम या सिनेमातून त्याने आपल्या सिनेकरिअरला सुरुवात केली होती. रितेशला शेवटचे टोटल धमाल सिनेमात पाहण्यात आले. लवकरच तो हाउसफुल ४ मध्ये दिसणार आहे. अक्षयचा ‘सूर्यवंशी’मधून 2 दिवसांचा ब्रेक, इतर मनोरंजन विश्वातील घडामोडी