तुषारसोबत भांडण झाल्यावर Ekta Kapoor ने बोलावले पोलिसांना Ekta Kapoor | Tusshar Kapoor | The Kapil Sharma Show |

तुषारसोबत भांडण झाल्यावर Ekta Kapoor ने बोलावले पोलिसांना Ekta Kapoor | Tusshar Kapoor | The Kapil Sharma Show |

Ekta Kapoor The Kapil Sharma Show आजही दोघं सहकुटुंब कोणत्या ट्रीपला जात असतील तर तुषार आणि एकता एकाच गाडीत बसून जात नाहीत. कारण त्यांच्यात प्रत्येकवेळी भांडण होतं.

  • Share this:

मुंबई, 26 जून- निर्माती एकता कपूरने (Ekta Kapoor) द कपिल शर्मा शोच्या (The Kapil Sharma Show) सेटवर एक मोठा खुलासा केला. यावेळी तिच्यासोबत भाऊ तुषार कपूरही आला होता. या भावा- बहिणींनी लहानपणापासून ते आतापर्यंत कधीही न ऐकलेले किस्से यावेळी सांगितले. यावेळी एकताने तुषारसोबत भांडण झाल्यावर पोलिसांना बोलावल्याचंही कबूल केलं. एकता म्हणाली की, ‘प्रत्येक भावा- बहिणीप्रमाणे आमच्यातही प्रचंड वाद होतात. तुम्हाला कदाचित हे खोटं वाटेल पण आम्ही सहकुटुंब एकदा तिरुपतीला पिकनिकला गेलो होतो. तिथे काही कारणांवरून माझ्यात आणि तुषारमध्ये प्रचंड वाद झाला. भांडणात तुषारने माझ्या नाकावर एक ठोसा दिला. यावर मला इतका राग आला की मी पोलिसांनाच फोन केला.’

चाहत्यावर भडकली तापसी पन्नू, म्हणाली- ‘फोन ठेव नाही तर फोडून टाकेन'

एवढंच नाही तर एकताने हेही मान्य केलं की आजही दोघं सहकुटुंब कोणत्या ट्रीपला जात असतील तर तुषार आणि एकता एकाच गाडीत बसून जात नाहीत. कारण त्यांच्यात प्रत्येकवेळी भांडण होतं. अजून एक अतरंगी किस्सा सांगताना एकता म्हणाली की, ‘जेव्हा आम्ही एकत्र शाळेत जायचो तेव्हाही आम्ही भयंकर भांडायचो. एवढी मारामारी करायचो की अनेकदा एकमेकांच्या कॉलरचे बटनही तोडायचो. यामुळे कपडे बदलण्यासाठी आम्हाला पुन्हा घरी जावं लागायचं आणि शाळेत जायला उशीर व्हायचा.’

पाकिस्तान कर्णधारासाठी बॉलिवूड आलं एकत्र, सोशल मीडियावर दिल्या प्रतिक्रिया

एकता कपूरच्या आगामी प्रोडेक्टबद्दल बोलायचे झाले तर लवकरच तिचा ‘मेंटल है क्या’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कंगना रणौत आणि राजकुमार राव यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय तुषार कपूर ऑल्ट बालाजीच्या हॉरर कॉमेडी वेब सीरिज ‘बू.. सबकी फटेगी’मध्ये दिसणार आहे. नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

अक्षयचा 'सूर्यवंशी'मधून 2 दिवसांचा ब्रेक, इतर मनोरंजन विश्वातील घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 26, 2019 02:27 PM IST

ताज्या बातम्या