मुंबई, 23 नोव्हेंबर : बिग बॉस हिंदी आणि मराठी असे दोन्ही सीझन सध्या टेलिव्हिजनवर धुमाकूळ घालत आहेत. त्यातील हिंदी बिग बॉस सातत्यानं चर्चेत आला आहे. याच कारण म्हणजे घरात गेलेला मराठमोळा शिव ठाकरे . शिवनं हिंदी बिग बॉसमध्ये एंट्री घेतल्यापासून खेळाची रंगत चांगलीच वाढली आहे. शिव बिग बॉसमध्ये गेल्यापासून त्याच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याची चांगलीच चर्चा होत आहे. त्यातही शिव आणि वीणा जगताप यांच्या नात्याची सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमधील हे लव्ह बर्ड्स प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. मात्र घराबाहेर पडल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान दोघांनी यावर बोलणं टाळलं आहे. मात्र वीणाच्या एका पोस्टमुळे दोघांचा ब्रेकअप झाल्याचं समोर आलं होतं. मात्र आता यांच्या लव्ह स्टोरीमध्ये ट्विस्ट आला आहे. शिव आणि वीणा या लव्ह बर्डचं ब्रेकअप झालं नाही असं समोर येत आहे. बिग बॉसच्याच एका विजेत्या स्पर्धकानं ही गोष्ट सर्वांना सांगितली आहे. बिग बॉस मराठीची पहिली विजेती अभिनेत्री मेघा धाडे बिग बॉसची मोठी फॅन आहे. अनेक वर्ष ती बिग बॉस फॉलो करतेय. मराठी सीझनची पहिली विजेती होण्याचा मान मेघानं पटकवला. बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वातील शिव आणि वीणा यांची लव्ह स्टोरीही तिला चांगलीच माहिती आहे. दरम्यान मेघानं याविषयी भाष्य केलं आहे. मेघाच्या या भाष्यानंतर आता शिव आणि वीणा यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हेही वाचा - Bigg Boss Marathi: शिव आणि वीणा या लव्ह बर्ड्सचं पुढे काय झालं? अभिनेत्रीचं उत्तर ऐकून बसेल धक्का मेघानं नुकतीच टेलीचक्करला मुलाखत दिली. या मुलाखतीत शिवच्या हिंदी बिग बॉसमधील प्रवासाबद्दल तिला विचारण्यात आलं. खरंतर मेघा देखील मराठीचा पहिला सीझन जिंकल्यानंतर हिंदी बिग बॉसमध्ये गेली होती. मात्र ती काही दिवसात बाहेर आली. शिव आणि अर्चनाच्या झालेल्या भांडणाबद्दल मेघाला विचारण्यात आलं. त्यानंतर तिनं शिव आणि वीणा यांच्या नात्याविषयी भाष्य केलं.
मुलाखतीत शिव आणि वीणा यांच्याबद्दल बोलताना मेघा म्हणाली, ‘बिग बॉसच्या घरात शिवला वीणा आवडली होती. त्यानं त्याचं प्रेम वीणा समोर व्यक्तीही केलं होतं. घराबाहेर पडल्यानंतरही दोघांचं सगळं नीट सुरू होतं. त्यांचं नातं आजही एका टप्प्यावर आहे. पण मी त्याबद्दल जास्त काही बोलणार नाही. शिव हिंदी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तुम्ही त्याला याविषयी विचारू शकता’. दोघांच्या नात्याबद्दल बोलताना मेघा पुढे म्हणाली, ‘शिव आणि वीणा यांचं नात खूप छान आहे. दोघांना जेव्हा एकमेकांची गरज असते तेव्हा ते एकमेकांसाठी हजर असतात. शिव हा टीव्हीवर दिसण्यासाठी नाती जोडणारा नाहीये. बिग बॉस संपल्यानंतरही घरातल्या लोकांशी त्यानं मैत्री आणि नातं टिकवून ठेवलं आहे’. यावरून शिव आणि वीणा यांचा ब्रेक अप झालेला नाहीये असं म्हणायला हवं.
मेघानं शिवचं केलेलं कौतुक ऐकून शिवचे चाहते आणखी खूश झाले आहेत. आता शिव आणि वीणा यांच्या लव्हस्टोरी नक्की काय झालंय हे शिव ठाकरे बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतरच कळणार आहे.