मुंबई, 7 मे- 'बिग बॉस मराठी'च्या
(Bigg Boss Marathi) तिसऱ्या सीजनप्रमाणेच या शोचा दुसरा सीजनसुद्धा
(Season 2) प्रचंड लोकप्रिय झाला होता. या शोचा दुसरा सीजन एका खास गोष्टीमुळे प्रचंड चर्चेत आला होता. आणि ती गोष्ट होती या घरात सुरु झालेली क्युट लव्हस्टोरी. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात एक लव्हबर्ड
(Lovebirds) जोडी होती. ही जोडी घऱात तर चर्चेत होतीच. पण घराबाहेर देखील त्यांच्या प्रेमाची चर्चा होती. ही जोडी म्हणजे दुस-या पर्वातील विजेता शिव ठाकरे आणि वीणा जगताप
(Shiv Thakare & Veena Jagtap) होय. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर या दोघांचा ब्रेकअप
(BREAKUP) झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.मात्र या दोघांनीं उघडपणे काहीही सांगितलं नाही. परंतु नुकतंच एका युजरने विचारलेल्या प्रश्नावर वीणा चांगलीच भडकलेली दिसली.
बिग बॉस मराठीचा दुसरा सीजन संपल्यानंतर वीणा आणि शिवला बऱ्याचवेळा एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं.हे दोघे एकेमकांच्या कुटुंबियांसोबतसुद्धा वेळ घालवताना दिसून आले होते. मात्र मागच्या काही दिवसांपासून या जोडीचं ब्रेकअप झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगल्याची दिसत आहे. कारणही तसेच आहे कारण वीणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. यामध्ये वीणाने तिच्या हातावरचा शिवच्या नावाचा टॅटू हटवल्याचे दिसले होते.शिवाय अनेक महिन्यांपासून हे दोघे एकदाही एकत्र दिसलेले नाहीत. त्यामुळे चाहत्यांच्या मनात हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान आता एका चाहत्याने असा काही प्रश्न विचारला की वीणा जगतापला आपला राग अनावर झाला. नुकतंच वीणाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'आस्क मी एनिथिंग'चा सेशन घेतला होता. यावेळी तिला युजर्सनी अनेक प्रश्नदेखील विचारले होते. ज्याची वीणाने बिनधास्त उत्तरे दिली. मात्र एका युजरने असा प्रश्न विचारला ज्यामुळे वीणा नाराज झाली.
'आस्क मी एनिथिंग' सेशन दरम्यान वीणाला एका युजरने विचारलं, 'शिव दादा आणि तुझ्यात काय सुरु आहे?' या प्रश्नावर वीणाने आपल्या स्टाईलमध्ये सडेतोड उत्तर दिलं आहे. यावेळी उत्तर देत वीणाने लिहिलंय, 'मी कोणत्याही व्यक्तीला माझ्या खाजगी आयुष्याबाबत उत्तरे द्यायला बांधील नाही. थोडी नैतिकता बाळगा आणि इतरांना श्वास घेऊ द्या. मी तुमच्या आयुष्याबाबत कधी विचारते की काय चाललंय आणि काय नाही. मी नेहमीच माझ्यापुरतं मर्यादित असते'. असं म्हणत वीणाने नेटकऱ्याला चांगलंच ठणकावलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.