मुंबई, 08 ऑक्टोबर : सध्या टेलिव्हिजनवर एकाच शोची चर्चा आहे ती म्हणजे बिग बॉस. मराठी आणि हिंदी असे दोन्ही सीझन सध्या सुरू आहेत. मराठी बिग बॉस चा चौथा सीझन सध्या सर्वाचं लक्ष वेधून घेतोय. हा सीझन देखील आधीच्या तीन सीझन सारखा गाजेल असं दिसतंय. तर दुसरीकडे हिंदी बिग बॉस मध्ये बिग बॉस मराठी 2चा विजेता शिव ठाकरे देखील दाखल झाला आहे. हिंदीमध्ये जाऊन शिव प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरतोय. बिग बॉस हिंदीमुळे सध्या शिव चर्चेत आहे. बिग बॉस जिंकल्यानंतरही शिव ठाकरे चर्चेत आला होता तो म्हणजे त्याच्या आणि अभिनेत्री वीणा जगपात च्या अफेअरमुळे. या दोघांचं पुढे काय झालं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घ्या बिग बॉस मराठी 2 शिव आणि वीणा यांच्या लव्ह स्टोरीमुळे चांगलाच गाजला. दोघांची हटके केमिस्ट्री शोला चार चांद लावून गेली. टास्क वेळी वीणानं शिवच्या नावाचा टॅटू देखील हातावर गोंदवून घेतला होता. शिव जिंकला तेव्हा वीणा प्रचंड खूश झाली होती. त्यानंतही दोघे सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसले होते. मात्र काही महिन्यातचं दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दोघांमध्ये नेमकं काय झालं होत? हेही वाचा - BBM4: ‘माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रेम आईनेच…’; अक्षय केळकरने सांगितला ब्रेकअपचा तो किस्सा बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर काही महिन्यात शिव आणि वीणाच्या ब्रेकअपच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या. दोघांचा एकत्र गोव्याला स्पॉट करण्यात आलं होतं. इतकंच काय तर शिवचा वाढदिवस देखील वीणानं गोव्यात साजरा केला होता. दोघांचं एकमेकांच्या घरी येणं जाण होतं मात्र अचानक दोघांनी सोशल मीडियावरून एकमेकांचे फोटो हटवले आणि चर्चांना उधाण आलं. इतकंच नाही वीणानं एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात तीन तिच्या हातावरील शिवच्या नावाचा टॅटू हटवला होता.
शिव आणि वीणा यांनी त्यांच्या बेकअपबद्दल कधीच खुलासा केला नसला तरी एका युझरच्या प्रश्नामुळे वीणा चांगलीच भडकल्याचं पाहायला मिळालं होतं. वीणानं इन्स्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग सेगमेंट घेतलं होतं. तिथे तिला एका फॅननं “शिव दादा आणि तुझ्यात काय सुरू आहे”? असा प्रश्न विचारला. तेव्हा वीणा चांगलीच भडकली आणि तिनं तिच्या स्टाइलमध्ये सडेतोड उत्तर दिली. ती म्हणाली होती की, “मी कोणत्याही व्यक्तीला माझ्या खासगी आयुष्यातील माहिती द्यायला बांधील नाहीये. थोडी नैतिकता बाळगा आणि इतरांना श्वास घेऊ द्या. मी तुमच्या आयुष्याविषयी कधी विचारते का की काय सुरू आहे आणि काय नाही. मी नेहमी माझ्यापुरती मर्यादित असते”.
वीणाच्या या उत्तरानं शिव आणि तिच्या बिनसलं असून दोघांचं ब्रेकअप झाल्याचं उघड झालं होतं. शिव सध्या हिंदी बिग बॉसमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तर वीणा सध्या मालिकांमध्ये साइड रोल करताना दिसतेय. ब्रेकअप नंतर दोघेही एकत्र आलेले नाहीत.