मुंबई, 7 ऑक्टोबर : ‘बिग बॉस मराठी 4’ सुरु झाला असून आज या पर्वाचा पाचवा दिवस आहे. गेल्या चार दिवसांमध्ये बिग बॉसच्या घरात सदस्यांनी अनेक वाद, राडे केलेले पहायला मिळाले. सोबतच स्पर्धकांची धमाल, मस्तीही प्रेक्षकांना पहायला मिळाली. आज पाचव्या दिवशी घरामध्ये जुने किस्से, गप्पा गोष्टी पहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकही आपल्या आवडत्या स्पर्धकांना पाहण्यासाठी त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. अभिनेता अक्षय केळकरने त्याच्या बेकअपचा किस्सा सांगितला. अक्षय केळकरला नात्यातीलच कोणी एक मुलगी मेसेजेस पाठवत होती जे त्याच्या आईच्या निदर्शनास आले आणि त्याचबद्दल अक्षयने सदस्यांना सांगितला किस्सा. अक्षय म्हणाला, ‘त्याने मेसेजेस इग्नोर केले पण आईने मात्र सांगितले कि, मुलगी तुला मेसेजेस करतं आहे, तुझ्यात इंटरेस्टेड असावी. नात्यातील होती म्हणून मी तिच्या घरी रहायला गेलो. त्यांच्यात झाली बरीच चर्चा. अक्षय म्हणाला छानचं होते ते क्षण, पण तो ब्रेक अप झाला आणि माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रेम आईनी जुळवून दिलं’. हेही वाचा - ‘माझी तुझी रेशिमगाठ’ मधील नेहाचे दोन्ही नवरे दिसणार बिग बॉस मराठी 4 मध्ये, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला अक्षय पुढे म्हणाला, एका इव्हेंटला गेलो असता मला सांगितलं काय सल्ला देशील. तेव्हा मी म्हणालो, “मी सल्ला नाही देणार पण, माझे आई बाबा नववी नापास आहेत, रिक्षावाला घरं सांभाळतो आहे, इतका फ्रिडम दिला दोन्ही मुलांना कि ते बरोबर मार्गावर चालत आहेत. शिक्षित राहून अशिक्षित राहण्यापेक्षा अशिक्षित राहून शिक्षित राहणं गरजेचे आहे.
दरम्यान, अजून सदस्यांमध्ये काय काय चर्चा झाल्या ? कोण काय काय बोलं ? कोणाचे राडे झाले ? कोणी घरात धम्माल मस्ती केली? कसा पार पडला टास्क?, आजच्या भागात बघायला मिळणार आहे.