'बिग बॉस मराठी'च्या सीजन दोनचा विजेता शिव ठाकरे सध्या बिग बॉस हिंदीमध्ये झळकत आहे. पहिल्याच आठवड्यात शिवने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
शिव ठाकरेने मराठी बिग बॉसचा दुसरा सीजन जिंकल्यानंतर सर्वांचं लक्ष आता हिंदी बिग बॉसकडे लागलं आहे.
फक्त प्रेक्षकच नव्हे तर शिवने होस्ट-अभिनेता सलमान खानचंसुद्धा मन जिंकलं आहे. नुकतंच प्रसारित झालेल्या भागात सलमान खानने शिवचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं होतं.
दरम्यान आता सोशल मीडियावरसुद्धा शिव ठाकरेला पसंती मिळताना दिसत आहे. आणि म्हणूनच शिव ठाकरे सध्या ट्विटरवर ट्रेंड होत आहे.
शिव ठाकरे अतिशय डोकं लढवून हा खेळ खेळताना दिसत आहे. शिवाय तो घरात आत्मविश्वासाने वावरत आहे. त्याचा हा अंदाज लोकांना भुरळ पाडत आहे.
शिव ठाकरेने बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीजनमध्ये भाग घेतला होता. या सीजनचा तो विजेतादेखील ठरला होता.
त्यामुळे शिवला या शोचा चांगलाच अंदाज आहे. या अनुभवाचा थोडाफार फायदा त्याला बिग बॉस हिंदीमध्ये होत असणार हे नक्की. आता शिव या शोमध्ये पुढे कसं खेळणार? काय प्लॅनिंग असणार? याकडे चाहत्यांचा लक्ष लागून आहे.