जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg boss 16मध्ये मराठमोळ्या शिव ठाकरेचा समंजसपणा! सलमाननं केलं कौतुक

Bigg boss 16मध्ये मराठमोळ्या शिव ठाकरेचा समंजसपणा! सलमाननं केलं कौतुक

शिव ठाकरे

शिव ठाकरे

बिग बॉस 16मध्ये सहभागी झालेल्या सर्वांचा लाडका शिव ठाकरे सोशल मीडियावर ट्रेंड मध्ये आहे. बिग बॉसच्या घरातील शिवचा समंजसपणा सर्वांना भावला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 08 ऑक्टोबर : मराठी बिग बॉस गाजवल्यानंतर आपला माणूस म्हणजेच महाराष्ट्राचा लाडका शिव ठाकरे हिंदी बिग बॉसमध्ये सहभागी झाला आहे. हिंदी बिग बॉसचा 16 वा सीझन देखील नुकताच सुरू झाला आहे.  घरात अनेक अतरंगी कलाकारांनी एंट्री घेतली आहे. त्यात मराठमोळा शिव ठाकरे चांगलाच उठून दिसत आहे. शिव ठाकरे बिग बॉसमध्ये गेल्यानं खेळाला वेगळीच रंगत आली आहे. शिव देखील त्याचा गेम उत्तमरित्या खेळत आहे. नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात स्वत: सलमान खान शिवचं कौतुक करताना दिसत आहे. त्याचप्रमाणे सलमाननं शिवला काही कमतरता देखील सांगितल्या. त्याचं उत्तर देत शिव ठाकरेनं सर्वांची मनं जिंकली आहे. शिव ठाकरेच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे ज्यात सलमान खान बिग बॉसच्या घरात सगळ्यांबरोबर जेवण करायला बसला आहे. जेवता जेवता सलमान सर्वांबरोबर गप्पा मारत सगळ्या गोष्टींचा आढावा घेत आहे.  सलमान शिवचं कौतुक मराठीतून करतो. तो म्हणतो, “शिव तू खूप छान खेळतोयस. पण शिव एक गोष्ट आम्ही बघितली तू जेव्हा कोणत्याही गोष्टीसाठी स्डँड घेतो आवाज उठवतोस. त्यानंतर तुझ्या विरोधात एक मोठा ग्रुप उभा राहतो. तेव्हा तिथे तू फसतोस तुझा आवाज दबून जातो”. हेही वाचा - Bigg Boss 16: मराठमोळा शिव ठाकरे ट्विटरवर होतोय ट्रेंड; काय आहे कारण? सलमानच्या या वक्तव्यावर शिव उत्तर देत म्हणतो, “सर माझा आवाज दबून जात नाही.  मी फक्त ती गोष्ट वाढवू इच्छित नाही.  कारण 4-5 दिवस झाले नंतर खूप भांडणं होतात.त्यानंतर घरातील वातावरण फार बदलतं. वाइब्स चेंज होतात. बोलणं होत नाही. सगळे एकएकटे बसतात. त्यामुळे भांडणं जितक्या लवकर संपवता येतील यासाठी मी थांबतो”.

जाहिरात

सलमान खान आणि घरातील सर्वांसमोर शिवनं दाखवलेला संमजसपणा चाहत्यांना आवडला आहे. शिव स्वत:बरोबर घरातील इतरांचा किती विचार करतो हे यातून दिसून आलं आहे. खेळासाठी लागणारी खरी मेहनत शिव घेत आहे. शिव पूर्णपणे डोक वापरून खेळत आहे.  शिवच्या फॅन्सनी त्याला या बाबतीत पूर्ण सपोर्ट केला आहे. सोशल मीडियावर शिवचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

शिवच्या या वागण्यामुळे शिव ठाकरे हिंदी बिग बॉस देखील जिंकून येईल असा विश्वास सगळ्यांना आहे.  “शिव तू खूप छान खेळतोयस. आम्ही नेहमी तुझ्याबरोबर आहोत”, असं चाहत्यांनी म्हटलंय. आणखी एका चाहत्यानं म्हटलंय, “शिव तू बरोबर भूमिका घेतोस, तुला आमचा फुल सपोर्ट आहे”.  तर अनेकांनी “जिंकणार तर शिव दादाचं”, असं म्हणत प्रेम व्यक्त केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात