जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसनं पूर्ण केलं राखीचं 'ते' स्वप्न; पाहून अभिनेत्रीला अश्रू अनावर

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉसनं पूर्ण केलं राखीचं 'ते' स्वप्न; पाहून अभिनेत्रीला अश्रू अनावर

बिग बॉस मराठी 4

बिग बॉस मराठी 4

बिग बॉस राखीला एक खास सरप्राईज देणार आहे. हे पाहून राखी चांगलीच भावुक झालेली पाहायला मिळाली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 02 जानेवारी :    सध्या  टेलिव्हिजनवरील एका शोची प्रचंड चर्चा सुरु आहे तो म्हणजे  बिग बॉस मराठी . हा शो आता शेवटाकडे आला असला तरी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करत आहे. आता या अंतिम टप्प्यात शो मध्ये स्पर्धकांमध्ये होणारे राडे वाढले असले तरी काही स्पर्धकांमध्ये मैत्रीचे गोड क्षण देखील पाहायला मिळतात. मैत्री आणि भांडण असा प्रवास पाहणाऱ्या  या बिग बॉसच्या आता काहीच स्पर्धक उरले आहेत. काल बिग बॉसच्या घरातून प्रसाद जवादे बाहेर पडला. त्यानंतर आता बिग बॉसवर प्रेक्षक प्रचंड नाराज झालेले दिसून येत आहेत. त्यातच आता आजच्या भागाचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. बिग बॉस मराठीचा पुढचा प्रोमो समोर आला आहे. बिग बॉस राखीला एक खास सरप्राईज देणार आहे. या सरप्राईजमुळे राखी चांगलीच भारावली आहे. प्रोमोनुसार, घरात खूप प्रेक्षक राखीसाठी वाट बघत थांबले आहे. राखीला पाहताच त्यांनी तिच्या नावाचा जल्लोष सुरु केला त्यानंतर तिला रोषणाईने सलामी देण्यात आली. हे सगळं पाहून राखी चांगलीच भारावली. तिला हे पाहून अश्रू अनावर झाले. हेही वाचा - Sheezan Khan : शिझानच्या बहिणींनी तुनिषाच्या आईबद्दल केला मोठा खुलासा; म्हणाल्या ‘त्या जबरदस्तीने… हे सगळं पाहून ती म्हणाली कि, ‘बिग बॉसच्या नावाने मला ओळखतात. मी जगते बिग बॉस. आज हे पाहून मी धन्य झाले. थँक्यू बिग बॉस’ असं म्हणत राखी भावुक झाली. राखीसाठी बिग बॉस म्हणाले, ‘राखी स्वप्न पाहण्यापेक्षा ते जगता आलं पाहिजे. आज वेळ आलीय ते स्वप्न जगण्याची’ आणि राखीला ते छान सरप्राईज मिळालं. या वेळी सगळ्यांनी बिग बॉसच्या घरातील आतापर्यंतचा राखीचा प्रवास बघितला. हे पाहून राखी चांगलीच भावुक झालेली पाहायला मिळाली.

जाहिरात

बिग बॉस मराठी 4 हा शो आता शेवटाकडे आला असला तरी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करत आहे. आता या अंतिम टप्प्यात शो मध्ये स्पर्धकांमध्ये होणारे राडे वाढले असले तरी काही स्पर्धकांमध्ये मैत्रीचे गोड क्षण देखील पाहायला मिळतात. मैत्री आणि भांडण असा प्रवास पाहणाऱ्या  या बिग बॉसच्या आता काहीच स्पर्धक उरले आहेत. लवकरच टॉप 5 स्पर्धक समोर येतील. आता अखेर बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्याची घोषणा झाली आहे. बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले  8 जानेवारी संध्या. 7:00 वा. फक्त कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे. आता बिग बॉसच्या स्पर्धकाला 15 लाखांचं बक्षीस मिळणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

आता बिग बॉसच्या घरात अंतिम टप्प्यात प्रसाद जवादेच्या एक्झिटनंतर  अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, अक्षय केळकर, किरण माने हे पहिल्यापासून घरात असणारे तर राखी सावंत आणि आरोह वेलणकर हे वाईल्ड कार्ड असे सहा स्पर्धक उरले आहे. तर अपूर्वा ही पहिली फायनलिस्ट ठरली आहे. आता यंदाच्या सिझन कोण जिंकणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहील आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात