मुंबई, 02 जानेवारी : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी तिचा बॉयफ्रेंड आणि मालिकेतील सह-कलाकार शिझान खान सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आलं असून कोर्टाने त्याची कोठडी 14 दिवसांपर्यंत वाढवली आहे. दुसऱ्यांदा त्याच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. अशातच या प्रकरणावर पहिल्यांदाच शिझान व्यक्त झाला आहे. शिझान निर्दोष आहे आणि त्याचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असं त्याचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी त्याच्या वतीने कोर्टात सांगितलंय. आता शिझानच्या कुटुंबांनी मोठा दावा केला आहे. शिझानच्या बहिणीं पत्रकार परिषद घेत त्याच्यावर तुनिषाच्या आईने केलेले सगळे आरोप फेटाळले आहेत. त्याच्या बहिणींनी सांगितलंय कि, ‘तुनीषाची आई जबरदस्ती तिला शूटिंगला पाठवत होती. तिला त्याची इच्छा नव्हती. तिच्याकडून जबरदस्तीने काम करून घेतलं जायचं. तिला काम करण्याऐवजी आराम करायचा असायचा तिला खूप फिरायचं होतं. पण तिची आई जबरदस्तीने तिच्याकडून काम करून घ्याची आणि तिला शूटिंगला पाठवायची.’ असं शिझानच्या बहिणी म्हणाल्या आहेत. हेही वाचा - Sheezhan Khan : ‘मी निर्दोष आहे आणि…’; तुनिषा शर्मा प्रकरणावर शीझान खानचं वक्तव्य शिझानच्या बहिणींनी तुनीषाला दर्ग्यात नेल्याचे आरोप देखील फेटाळले आहेत. त्यांनी या संबंधी तिच्या आईला पुरावे मागितले आहेत. तसेच शिझान ड्रग्स घ्यायचा हे आरोप देखील फेटाळून लावले आहेत. तसेच ‘त्या म्हणाल्या तुनिषाच्या आईने आमच्याविषयी गैरसमज पसरवले आहेत.‘एवढंच नाही तर शिझानची आई म्हणाली कि ‘आम्हालासुद्धा तुनिषाला न्याय मिळवून द्यायचा आहे.‘शिझानच्या बहिणींनी केलेल्या या दाव्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण लागण्याची शक्यता आहे. आता सत्य नेमकं काय आहे, कोण खरं, कोण खोटं हे येणाऱ्या काळात समोर येईल.
आज सोमवारी शीझानचे वकील मिश्रा न्यायालयात खटल्याच्या संदर्भात पहिला जामीन अर्ज दाखल करणार आहेत. 28 वर्षीय अभिनेता शीझान खानला कोर्टात हजर करण्यात आले. त्याचवेळी शीझानच्या वतीने वकिलाने तुरुंगात त्याचे इनहेलर आणण्याची मागणी केली होती, त्याशिवाय त्याने घरचे जेवण मागवण्याची परवानगीही दिली होती. इतकंच नाही तर अभिनेत्याच्या वकिलाने तुरुंगात केस कापू नयेत असंही त्याच्यावतीने सांगितलं होतं. या सगळ्या प्रकरणात सत्य लवकरच समोर यावं आणि तुनिषाला न्याय मिळावा अशी प्रार्थना तिचे चाहते करत आहेत. तसेच शिझान आज जामीन अर्ज करणार आहे, त्यामुळे त्याला जामीन मिळणार की तो पोलीस कोठडीतच राहणार ते पाहणं देखील महत्वाचं आहे.