मुंबई, 19 जानेवारी: बिग बॉस मराठीचा चौथा सिझन संपून काहीच दिवस उलटले आहे. हा चौथा सिझन चांगलाच गाजला. अक्षय केळकर या सीझनचा विजेता तर अपूर्वा नेमळेकर उपविजेती ठरली. तर किरण मानेंनी टॉप ३ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवलं. या स्पर्धकांची चांगलीच चर्चा झाली. दरम्यान आता बिग बॉस संपलं असलं तरी हे स्पर्धक मात्र कायम चर्चेत आहेत. आता किरण माने - अपूर्वा नेमळेकर यांच्याविषयी नुकतीच एक महत्वाची माहिती समोर येत आहे. ती म्हणजे एका चित्रपटासाठी हे दोघे एकत्र येणार आहे.
किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर हे दोघे बिग बॉसच्या घरातील सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेले स्पर्धक आहेत. या दोघांनी मिळून बिग बॉसचं पर्व गाजवलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. घरात पहिल्या दिवसापासून या दोघांचा छत्तीसचा आकडा होता पण शेवट्पर्यंत दोघांमध्ये चांगली मैत्री देखील झाली. आता हे दोघे लवकरच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. टीआरपी मराठी या इंस्टाग्राम पेजच्या दिलेल्या वृत्तानुसार किरण आणि अपूर्वा 'रावरंभा' या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत.
हेही वाचा - Urfi Javed : चित्रा वाघांसोबत वादादरम्यान उर्फीच्या कुटुंबियांची झाली अशी अवस्था; अभिनेत्रीचा मोठा खुलासा
‘रावरंभा’ हा ऐतिहासिक सिनेमा असून या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटामध्ये झी मराठीवरील 'तू तेव्हा तशी मालिकेतील अभिनेता ऐतिहासिक भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट स्वराज्याचे दुसरे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या चरित्रावर आधारित आहे. त्यांची एक लक्षवेधी झलक समोर आली होती.
View this post on Instagram
या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अनुप जगदाळे यांनी सांभाळली आहे. सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेमध्ये हिंदी, मराठी सिनेमांमध्ये आपली छाप उमटवणारे अभिनेते अशोक समर्थ दिसणार आहेत. अभिनेते अशोक समर्थ नुकतेच झी मराठीवरील 'तू तेव्हा तशी मालिकेत झळकले होते. त्यांची या मालिकेत त्यांनी अनामिकाच्या नवऱ्याची आकाश जोशीची भूमिका साकारली होती. आता त्यांच्या साथीला या चित्रपटात बिग बॉस गाजवलेले किरण माने - अपूर्वा नेमळेकर देखील झळकणार आहेत.
दरम्यान रावरंभा’चे नेमके कथानक काय आहे ? याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. लवकरच यातील प्रत्येक पात्र रसिकांसमोर येणार असून ‘रावरंभा’ ही भव्यदिव्य ऐतिहासिक कलाकृती पहाण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. तसेच किरण माने - अपूर्वा नेमळेकर या दोघांच्या भूमिका नेमक्या काय असणार हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरी या दोघांना पहिल्यांदा एकत्र पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss marathi, Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment