'बिग बॉस मराठी'चा चौथा सीजन फारच धमाकेदार ठरला. यामध्ये अक्षय केळकर विजेता ठरला. तर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर उपविजेता ठरली. आता अपूर्वा नेमळेकरला पुन्हा पद्द्य्वर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
'बिग बॉस मराठी'चा चौथा सीजन फारच धमाकेदार ठरला. यामध्ये अक्षय केळकर विजेता ठरला. तर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर उपविजेता ठरली.
2/ 8
अपूर्वा नेमळेकर बिग बॉस मराठीमुळे प्रचंड चर्चेत आली होती. शो संपल्यानंतरसुद्धा अभिनेत्री अजूनही चर्चेत आहे.
3/ 8
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर नुकतीच तिने एक घोषणा केली आहे.
4/ 8
बिग बॉसनंतर आता अपूर्वा लवकरच एका शॉर्ट फिल्ममध्ये दिसणार आहे.
5/ 8
‘द डिलिव्हरी बॉय’ असं या शॉर्ट फिल्मच नाव असून स्वयंभू स्टुडिओजने या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे. ती बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी तिने या शॉर्टफिल्मचे चित्रीकरण पूर्ण केले आहे.
6/ 8
बिग बॉस कार्यक्रमात अपूर्वाच्या खेळाडूवृत्तीने, तिच्या स्पष्टवाक्तेपणामुळे सर्वांचं लक्ष वेधलं. बिग बॉसमुळे ती घराघरात लोकप्रिय झाली.
7/ 8
‘आभास हा’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलेल्या अपूर्वाला ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील शेवंतामुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली.
8/ 8
आता तिला या नवीन भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.