नुकताच बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. अक्षय केळकर या पर्वाचा विजेता ठरला.
खेळाडू वृत्ती, स्पष्टवक्तेपणा आणि कठोर निर्णयक्षमता या गुणांच्या बळावर अक्षयने या पर्वाच विजेतेपद स्वतःच्या नावावर केलं.
त्याच्यावर सगळीकडून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पण त्याचबरोबर इतर बक्षिसांसहित त्याला एकूण किती लाखांची रक्कम मिळाली आहे पाहा.
बिग बॉस मराठी ४ चा विजेता अक्षय केळकरला ट्रॉफी आणि १५ लाख ५५ हजार इतकी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे.
तर पीएनजी ज्वेलर्स यांच्याकडून अक्षय केळकरला 10 लाख रुपये किमतीचा सोन्याचं ब्रेसलेट बक्षीस म्हणून मिळाला आहे. सगळी मिळून अक्षय 30 लाख एवढी रक्कम जिंकला आहे.