मुंबई, 19 जानेवारी: अभिनेत्री उर्फी जावेद प्रकरण सध्या चांगलंच तापलं आहे. उर्फी विरुद्ध चित्रा वाघ असा वाद दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. दोघीही सातत्याने एकमेकींवर आरोप प्रत्यारोप करतायत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीचा नंगानाच महाराष्ट्रात चालणार नाही म्हणत तिच्या फॅशन स्टाइलवर आक्षेप घेतला. तिला अटक करण्याची देखील मागणी केली. त्यानंतर उर्फीही काही मागे हटली नाही. या दोघीत ट्विटर वॉर सुरू आहे. एवढंच नाही तर आता इतर राजकारण्यांनी देखील उर्फीच्या प्रकरणात उडी घेत आपापलं मत मांडलं. आता उर्फीने घरच्यांविषयी मोठा खुलासा केला आहे. उर्फी तिच्या अतरंगी फॅशनमुळे कायम चर्चेत राहते. याविषयी बोलताना ती म्हणाली, ‘नेटकऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी मी हे सर्व करते आणि त्यात काय चूक आहे.’ उर्फीचे म्हणणे आहे की, ‘मी काहीही चुकीचे केले नाही परंतु मला गुन्हेगारासारखे वागवले जात आहे. एवढंच नाही तर, तिला बलात्कार आणि खुनाच्या धमक्या येत आहेत असा खुलासा नुकतंच एक मुलाखतीत उर्फीने केला आहे. हेही वाचा - Shahrukh Khan: दीपिकाच्या ‘त्या’ बिकिनी लूकवर पहिल्यांदाच बोलला शाहरुख; ‘ते’ वक्तव्य चर्चेत उर्फीच्या घरच्यांविषयी जाणून घेण्याची सगळ्यांना कायमच उत्सुकता असते. तिने याआधी घरच्यांविषयी सांगितलं होतं कि, ‘तिच्या घरचे खूप कट्टर विचारांचे आहेत. तिच्या वडिलांनी तिचं मानसिक शोषण केलं. त्यामुळे ती घरातून पळून आली.’ आता उर्फीवरून राजकारण तापलं असताना तिने आई वडिलांविषयी अजून एक मोठा खुलासा केला आहे.
‘इटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये उर्फीने म्हटलं की, “माझे कुटुंबियलखनऊमध्ये राहतात आणि ते माझ्या आयुष्यामध्ये डोकावून पाहत नाहीत. पण माझ्या आईला सध्या धमक्या येत आहेत., हे जेव्हा ऐकते तेव्हा खूप घाबरते. कारण धमक्या फक्त सोशल मीडियावरच नाही तर फोनवरही येतात.’ तिचे हे वक्तव्य सध्या व्हायरल होत आहे. उर्फीच्या आईला तिच्या मुलीची चिंता सतावत आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत मुंबई पोलिसांत तिच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्याचप्रमाणे मोर्चा देखील काढला. चित्रा वाघांच्या तक्रारी नंतर उर्फीनं ट्विट करत चित्रा वाघांवर निशाणा साधला. तुमच्यसारखे राजकारणी माझा वापर करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात महिलांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्याकडे तुम्ही का लक्ष देत नाही असा सवाल केला. महिला आयोगाकडे चित्रा वाघ यांच्याबाबत तक्रारीचं पत्र लिहित सुरक्षा पुरवण्याची मागणी उर्फीने केली होती. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांकडे उर्फीने तक्रार केली. उर्फी व चित्रा वाघ यांच्यामधील वाद कधी संपणार? की हा वाद आणखीनच वाढत जाणार हे येणारा काळच सांगू शकेल.