मुंबई, 29 स्पटेंबर ; बिग बॉस मराठीमध्ये (Bigg Boss Marathi 3 ) जोडी की बेडी या टास्कने चांगलीच रंगत आणली आहे. घऱातील स्पर्धक हा टास्क कसा जिंकता येईल यासाठी वाटेल ते करत आहे. या टास्कमध्ये बिग बॉसने स्पर्धकांना जोड्यांमध्ये विभागलं आहे. प्रत्येक स्पर्धकाला एक जोडीदार देण्यात आला आहे. या जोडीदारांसोबतच स्पर्धकांना आठवडाभर टास्क करायचे आहेत. याशिवाय नव्या टास्कमध्ये दोन गट पाडण्यात आले आहे. हल्लाबोल असं या टास्कचं नाव असून या टास्कमध्ये स्पर्धकांनी अक्षरक्ष: राडा केल्याचं दिसत आहे. सर्वांना हा टास्क जिंकायचा आहे असंच दिसत आहे. या टास्कदरम्यान मीरा (Mira Jagannath) उगाच सोनालीच्या (Sonali Patil) वाकड्यात जाताना दिसत आहे. टास्कवेळी सोनाली आणि सुरेखाताई गाडीत बसल्या आहेत. यावेळी मीरा आणि स्नेहा वाघची जोडी त्यांना उठवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. यावेळी सोनाली शांत दिसत आहे. मात्र मीरा नेहमीप्रमाणे रंगात आली आहे आणि सोनालीला बोलू लागली आहे.
मीरा सोनालीला .कोल्हापूरची..कोल्हापूरची, गावची म्हणत सोनालीच्या भाषेची, टोणची टर उडवताना दिसत आहे. हे वाचा - अक्षया देवधरचं ‘याड लागलं’; सोशल मीडियावर VIDEO होतोय VIRAL मीरा म्हणते आहे, आता बघुयात या टास्क किती खेळत्यात. कारण बाहेर तर या सोनालीचे चॅव..चॅव चालूच असतं. यावेळी सोनालीला मीरा तिच्या भाषेवरून म्हणत आहे फेक टोण..फेक मुलगी. कोल्हापूरची कोल्हापूरची म्हणून उगाच सिम्पथी घेते. आम्ही पण गावचेच आहोत. शेतातूनच आलोय ..म्हणून काय उगाच चॅव..चॅव करत नाही.. आता मीराच्या या चॅव..चॅव नंतर सोनाली काय पाऊल उचलणार. टास्क अर्धवट सोडणार की ती मीराला कोल्हापूरचा ठसका दाखवणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. हे वाचा - खऱ्या आयुष्यातला संसार मोडल्यानंतर अविष्कार-स्नेहा BB टास्कसाठी आमनेसामने मीराच्या अशा बोलण्यावर नेटकऱ्यांनी देखील मीराला चांगलंच सुनावलं आहे. एकाने तर मीराला म्हटलं आहे की..शेतातून आलेले लोक असं बोलत नाहीत. यासोबत काही नेटकऱ्यांनी कोल्हापूरच्या सोनालीला पाठिंबा दर्शवला आहे.