मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अक्षया देवधरचं 'याड लागलं'; सोशल मीडियावर VIDEO होतोय VIRAL

अक्षया देवधरचं 'याड लागलं'; सोशल मीडियावर VIDEO होतोय VIRAL

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमुळे अक्षया घराघरात पोहोचली आहे. सध्या अक्षया कोणत्याच मालिकेत दिसत नसली, तरी तिची क्रेझ कायम आहे.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमुळे अक्षया घराघरात पोहोचली आहे. सध्या अक्षया कोणत्याच मालिकेत दिसत नसली, तरी तिची क्रेझ कायम आहे.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमुळे अक्षया घराघरात पोहोचली आहे. सध्या अक्षया कोणत्याच मालिकेत दिसत नसली, तरी तिची क्रेझ कायम आहे.

मुंबई, 29 सप्टेंबर- 'तुझ्यात जीव रंगला'(Tuzyat Jiv Rangala) फेम अभिनेत्री अक्षया देवधरने (Akshaya Devdhar) आपला एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर शेअर(Instagram Video) केला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच याड लागलं आहे. हा जबरदस्त रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमुळे अक्षया घराघरात पोहोचली आहे. सध्या अक्षया कोणत्याच मालिकेत दिसत नसली, तरी तिची क्रेझ कायम आहे. अक्षया सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. अक्षया देवधर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती सतत आपले ग्लॅमरस, ट्रॅडिशनल फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना खुश करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट्स देतात. नुकताच अक्षयाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक रील शेअर केला आहे. यामध्ये अक्षया एका झोपाळ्यावर झोका घेताना दिसत आहे. यामध्ये ती लाल-काळया रंगाच्या नऊवारी साडीमध्ये दिसून येत आहे.

(हे वाचा:ती माझी ग्रेट भेट'; रेखा दुधाणेनं 'जीव माझा गुंतला' फेम अंतराला दिलं मोठं सरप्र )

तसेच अक्षयाने साडीवर साजेसे पारंपरिक दागिनेही घातले आहेत. शिवाय केसांचा अंबाडाही बांधला आहे. कपाळावरची चंद्रकोर तिच्या सौंदर्यात चार चाँद लावत आहेत. हा रील 'सैराट' च्या जबरदस्त गाजलेल्या 'याड लागलं' या गाण्यावर बनवण्यात आला आहे. अक्षयाचं सौंदर्य आणि त्याला साजेसे गाण्याचे या एकत्र संयोगाने रसिक घायाळ होत आहेत. अक्षयाने यापूर्वीहि अनेक रील्स बनवले आहेत. त्या प्रत्येक व्हिडीओमधील अभिनेत्रीचा अंदाज चाहत्यांना चांगलाच भावतो. ट्रॅडिशनल असो किंवा वेस्टर्न प्रत्येक लूकमध्ये अक्षया चाहत्यांना तितकीच पसंत पडते. चाहते अक्षयाच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.

(हे वाचा:'पदर, पदर... ' शिवलीला पाटीलचा जुना VIDEO व्हायरल; Bigg Boss'अंदाजाने उडवली जाते)

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने अंजली अर्थातच अक्षयाला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. काही महिन्यांपूर्वी मालिकेने आपला निरोप घेतला आहे. तरी अजूनही लोक या मालिकेची आठवण काढतात. लोकांना आजही राणा-अंजलीची जोडी प्रचंड आवडते. मूळच्या पुण्याच्या असणाऱ्या अक्षयाने कोल्हापूरच्या रांगड्या मातीत या मालिकेचं शूटिंग केलं होतं. हि मालिका कोल्हापूरच्या एका खेडेगावावर आधारित असल्याचं दाखवण्यात आलं होतं. या मालिकेतील 'चालतंय की' सारखे अनेक डायलॉगही प्रसिद्ध झाले होते. मालिकेतील राणाने अर्थातच हार्दिक जोशीने नव्या मालिकेसह पुनरागमन केलं आहे. मात्र आता चाहत्यांना अंजली म्हणजेच अक्षया देवधरनेही लवकरात लवकर पुन्हा नव्या मालिकेसह पुनरागमन करावं ही अपेक्षा आहे.

First published:
top videos

    Tags: Marathi actress, Marathi entertainment