मुंबई, 29 स्पटेंबर ; 19 सप्टेंबरपासून बिग बॉस मराठी सीजन (Bigg Boss Marathi 3) सुरू झाला आहे. सहा दिवस घरात राहिल्यानंतर शनिवारी बिग बॉसची (Bigg Boss Marathi 3 Latest Update) पहिली चावडी रंगली. बिग बॉसच्या पहिल्या चावडीनंतर नव्या आठवड्यात नवा खेळ 'जोडी की बेडी' चांगलाच रंगात अल्याचे दिसत आहे. या टास्कदरम्यान कुणाचे ना कुणाचे दररोज खटके उडत आहे. अभिनेत्री स्नेहा वाघ आणि अभिनेता अविष्कार दारव्हेकर घटस्फोटनंतर अनेक वर्षांनंतर या शोच्या निमित्ताने एकमेकांसमोर आले आणि आता एकाच छताखाली राहत आहेत. या टास्कदरम्यान हे दोघे एकमेंकासमोर आले आहेत. या टास्कदरम्यान स्नेहाने (Sneha Wagha ) अविष्कार दारव्हेकरकला ( Avishkar Darwhekar )असा काही टोमणा मारला आहे ज्यावर आता अविष्कार काय प्रतिक्रिया देतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. महेश मांजरकेर यांनी सांगून ही हे दोघे वैयक्तिक भांडण येते भांडताना दिसत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
अविष्कार दारव्हेकर टास्क दरम्यान विकास पाटील याला प्रोत्साहित करत असतात. तर दुसरीकडे स्नेहा वाघ विकासच्या टास्कमध्ये अडथळा निर्माण करत असते. मी हा टास्क करायला तयार आहे ..आता मला हा टास्क खेळायचा नाही कारण आता तुला हा टास्क खेळायचा आहे. हा टास्क करू शकतोय.. हा टास्क तुला करायचा आहे आणि तू हे चांगल्या प्रकारे करत आहेस....असं अविष्कार म्हणत असतो. यावेळी स्नेहा अविष्कारवर रोख धरून एक सणसणीत टोमणा हाणते. स्नेहा म्हणते..जो माणूस स्वत:चा होऊ शकत नाही तो दुसऱ्याचा काय होणार..? यातून स्नेहाल नेमके काय म्हणायचे आहे सर्वांना समजलेले नाही. मात्र तिने हा टोमणा नक्की अविष्कारलाच मारला आहे हे नक्की. आता यावर अविष्कार काय प्रतिक्रिया देणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
आतापर्यंत या शोमध्ये स्नेहाने आपल्या आधीच्या आयुष्याबद्दल एक शब्दही काढला नसला तरी या टास्कदरम्यान मात्र या दोघांच्या नात्यामधील हे गुपीत या टोमण्याच्या माध्यमातून समोर आलेले आहे. त्यामुळे भविष्यात या घऱात या दोघांच्यात जुन्या गोष्टींवरून वाद होणार का..? असा देखील प्रश्न पडला आहे. तसेच महेश मांजरेकर यांनी देखील स्नेहा आणि अविष्कारला वैयक्तिक गोष्टी घरात काढू नका असा सल्ला देखील दिला आहे. त्यामुळे आता स्नेहाच्या या टोमण्यामुळे या टास्कवर काय परिणाम होणार का हे आजच्या भागात पाहण्यास मिळणार आहे. तसेच तिच्या या टोमण्यावर महेश मांजरेकर चावडीवर काय बोलणार हे देखील पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
स्नेहा समजूतदार नाही ती प्रचंड तापट आहे.
View this post on Instagram
यापूर्वी अविष्कार घरातील सदस्य जय दुधाणे सोबत त्याच्या स्नेहासोबतच्या घटस्फोटाबद्दल बोलताना दिसला होता. अविष्कार जयला म्हणाला होता की, 'स्नेहासोबतचा घटस्फोट त्याच्या आयुष्यातली सगळ्यात वाईट घटना होती.' स्नेहाने अविष्कारवर अनेक आरोप लावले होते. अविष्कार जयला म्हणतो की, घटस्फोटानंतर त्याचा कबीर सिंग झाला होता कारण स्नेहापासून वेगळं झाल्यानंतर तो खूप दारू प्यायला लागला होता. त्यावर जय अविष्कारला म्हणतो, 'स्नेहा या घरातली सगळ्यात जास्त जबाबदार, शांत आणि समजूतदार व्यक्ती आहे.' यावर अविष्कार म्हणतो, 'समजूतदार नाही ती प्रचंड तापट आहे. तुला वेळ आल्यावर कळेलच.'
तसेच अविष्कारने म्हटल्याप्रमाणे सुरूवातीला शांत वाटणारी स्नेहा शोमध्ये मीनल शहा हिच्यावर ओरडताना दिसली होती. तसेच या टास्कदरम्यान देखील तिचा तापट अंदाज सर्वांना पाहण्यास मिळाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Bigg boss marathi, Colors marathi, TV serials