Bigg Boss Marathi 2- विद्याधर जोशींची घरातून एक्झिट, जाताना या स्पर्धकाला दिलं जीवनदान

Bigg Boss Marathi 2- विद्याधर जोशींची घरातून एक्झिट, जाताना या स्पर्धकाला दिलं जीवनदान

Bigg Boss Marathi 2 बिग बॉस मराठीच्या घरात पूर्ण आठवड्यात बऱ्याच घटना घडल्या. अनेकांना मांजरेकरांनी फैलावर घेतलं.

  • Share this:

मुंबई, 24 जून- बिग बॉस मराठीच्या घरात पूर्ण आठवड्यात बऱ्याच घटना घडल्या. अनेकांना मांजरेकरांनी फैलावर घेतलं. घरामध्ये पार पडलेल्या एक डाव धोबीपछाड हा टास्क असो किंवा शेरास सव्वा शेर हा नॉमिनेशन टास्क असो सगळ्यावरच स्पर्धकांना महेश यांच्याकडून ओरडा ऐकावा लागला होता. गेल्या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातून दिगंबर नाईक घराबाहेर पडला होता. आता दर आठवड्याला एका स्पर्धकाला बाहेर जाणं अनिवार्य असणार आहे. या आठवड्यात विणा जगताप, सुरेखा पुणेकर, विद्याधर जोशी, पराग कान्हेरे, शिव ठाकरे हे नॉमिनेशनमध्ये होते ज्यामध्ये पराग कान्हेरे आणि विद्याधर जोशी डेंजर झोनमध्ये होते. मात्र अखेर बाप्पा अर्थात विद्याधर जोशी यांना बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर जावं लागलं.

या टीव्ही अभिनेत्रीने दिला मुलीला जन्म, पहिल्या मुलीनं केलं अनोखं स्वागत

विद्याधर यांचं नाव जेव्हा मांजरेकरांनी घेतलं तेव्हा सगळेच स्पर्धक भावूक झाले. विद्याधर जोशींना त्यांच्या आतापर्यंतच्या घरातील प्रवासाची एक सुंदर व्हिडिओ दाखविण्यात आला. घरातून निघाल्यानंतर महेश मांजरेकर यांनी विद्याधर यांना एक विशेष अधिकार दिला ज्यामध्ये त्यांना घरातील एका सदस्याला सेफ आणि अनसेफ करायचे होते. त्यांनी नेहा शितोळेला सेफ केले आणि कोणत्याही स्पर्धकाला अनसेफ करण्यास नकार दिला. दरम्यान, एक डाव धोबीपछाड या टास्कमध्ये वैशाली संपूर्ण टास्क टीम बीच्याच बाजूने खेळली असे टीम एचं म्हणणं पडलं. तर विणा, किशोरी आणि रुपाली यांचा KVR ग्रुप पहिल्या आठवड्यापासून घरामध्ये आणि प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान ग्रुपच्या मुद्द्यावरून पराग आणि विणामध्ये बरीच वादावादी झाली. एक डाव धोबीपछाड हा टास्क टीम बी संचालिकेच्या मदतीशिवाय जिंकले असते तर विजेते वाटले असते असे महेश मांजरेकर म्हणाले.

MeTooप्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर नाना पाटेकरांच्या 'नाम'वर तिने उठवले प्रश्न

यावेळी म्हणींचा एक वेगळा खेळ खेळण्यात आला. ज्यात मांजरेकरांनी सांगितलेली म्हण कोणाला लागू होतं हे स्पर्धकांना सांगायचं होतं. 'काना मागून आली आणि तिखट झाली,' ही म्हण हीनाला योग्य आहे असे रुपालीचं म्हणणं पडलं. 'वासरात लंगडी गाय शहाणी,' ही म्हण वैशालीला तर, 'बडी बडी बाते वडापाव खाते' ही म्हण परागला योग्य आहे असे सर्वच सदस्य म्हणाले. 'उथळ पाण्याला खळखळाट फार' ही म्हण माधवला योग्य आहे असं अनेकांचं म्हणणं पडलं. यानंतर अजून एक गंमतीदार खेळ रंगला, ज्यामध्ये सदस्यांना ऐकवण्यात आलेली गाणी कोणासाठी आहे हे ओळखायचे होते. ज्यात सदस्यांनी बरीच धम्माल मस्ती केली. बिग बॉस मराठीच्या सिझन २ मध्ये आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल... प्रेक्षकांचं मत कोणाला वाचवेल आणि कोण घराबाहेर जाईल हे पाहणं रंजक असणार आहे.

नऊवारी साडी नेसवत या अभिनेत्रीने साजरा केला जुळ्या मुलींचा पहिला वाढदिवस

VIDEO: विदर्भ, मराठवाड्यात मान्सूनची एन्ट्री, मुंबईकडे फिरवली पाठ

First published: June 24, 2019, 9:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading