प्रसिद्ध टीव्ही मालिका दीया और बाती हममधील अभिनेत्री पूजा शर्मा आणि तिचा नवरा पुष्कर पंडीत यांच्या घरी सध्या जल्लोष सुरू आहे. पूजाने नुकतंच तिच्या दुसऱ्या मुलीला जन्म दिला.
पूजा आणि पुष्करने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून नवजात बाळाचे काही फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.
या फोटोंमध्ये पूजाची मोठी मुलगी वियाना आणि नवजात बालक दिसत आहे. लहानगी वियानी आपल्या छोट्या बहिणीला मांडीवर घेऊन तिचे लाड करताना दिसत आहे.
पूजा आणि पुष्कर दोघांनीही आपल्या दोन्ही मुलींचे फोटो शेअर करत लिहिले की, ‘माझ्या दोन पऱ्या. याहून जास्त देवाकडे काही मागू शकत नाही. वियाना तिच्या छोट्या बहिणीचं स्वागत करत आहे.’
पूजा शर्माने स्टार प्लसच्या दीया और बाती हम या प्रसिद्ध मालिकेत नकारात्मक भूमिका साकारली होती. पूजा आणि पुष्करने २०१६ मध्ये लग्न केलं होतं.