आता #MeToo प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर नाना पाटेकरांच्या फाउंडेशनवर तनुश्रीने उठवले प्रश्न

आता #MeToo प्रकरणात क्लीन चिट मिळाल्यानंतर नाना पाटेकरांच्या फाउंडेशनवर तनुश्रीने उठवले प्रश्न

nana patekar शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं काय की जे रोज दुष्काळाने आणि कर्जाने मरत आहेत. त्या पैशांचं काय जे शेतकऱ्यांच्या नावाने घेतले पण त्यांना दिलेच नाहीत.

  • Share this:

मुंबई, 23 जून- तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर मीटू चळवळीअंतर्गत यौन शोषणाचा आरोप केला होता. यानंतर काही दिवसांपूर्वी पोलिसांनी नाना पाटेकर यांना क्लिन चीट दिली होती. पण तनुश्रीचा राग शांत झालेला दिसत नाहीये. तनुश्रीने पुन्हा नाना यांच्यावर आणि त्यांच्या नाम या संस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पिंकविला या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या मुलाखतीत तनुश्री दत्ताने नाम संस्थेअंतर्गत नाना जे काम करतात ते यात गरीब लोकांची फसवणूकच करत असल्याचं ती म्हणाली. तनुश्रीच्या मते, नाना यांचं खरं रूप लवकरच लोकांच्या समोर येईल. नाना यांनी हॉर्न ओके प्लीज सिनेमाच्या सेटवर झालेल्या प्रकरणी कसं खोटं विधान केलं आहे याची जाणीव लोकांना लवकरच होईल.

Bigg Boss Marathi 2- शिव म्हणजे तर घरात सोडलेला वळूच- महेश मांजरेकर

तनुश्री पुढे म्हणाली की, ‘नाना यांच्या टीमने मीडियासमोर त्यांची प्रतिमा चांगली ठेवली आहे. हे सगळ्यांना दिसतंयही. पण त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं काय की जे रोज दुष्काळाने आणि कर्जाने मरत आहेत. त्या पैशांचं काय जे शेतकऱ्यांच्या नावाने घेतले पण त्यांना दिलेच नाहीत. याशिवाय नाना ज्या पद्धतीने गरीबाप्रमाणे राहतात तो सर्व दिखावा आहे.’ असंही ती म्हणाली. तनुश्रीने नाना यांच्यावर छेडछाड करण्याचा आरोप करत तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी पुरेशा पुराव्या अभावी पोलिसांनी नाना यांना क्लिन चीट देत प्रकरण संपवलं.

शाळेत मुलीची मस्करी केल्यामुळे भडकल्या स्मृती इराणी, दिलं जशास तसं उत्तर

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तनुश्री दत्ताने #MeToo चळवळीअंतर्गत नाना पाटेकरांवर हॉर्न ओके प्लीज सिनेमाच्या सेटवर छेडछाड केल्याचा आरोप केला होता. २००८ मध्ये या सिनेमाच्या चित्रीकरणावेळचा अनुभव सांगताना म्हटलं होतं की, नाना पाटेकर यांनी अंगलगट करण्याचा प्रयत्न केला होता. चित्रीकरणादरम्यान गाण्याचा हिस्सा नसतानाही इंटीमेट होण्याचा प्रयत्न केला होता.

मेकअपशिवाय अशी दिसते कतरिना कैफ, फोटो झाला VIRAL

VIDEO : बिचुकलेचं पितळ उघडं, आणखी एका गुन्ह्यात अडकला

First published: June 23, 2019, 5:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading