बिग बॉस विजेत्या अभिनेत्याच्या भावाचा बुडून मृत्यू

बिग बॉस विजेत्या अभिनेत्याच्या भावाचा बुडून मृत्यू

विशेष म्हणजे रुपेशला पोहता येत नव्हतं तरी तो समुद्रात गेला होता. रुपेशचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं.

  • Share this:

टोरंटो, 05 जुलै- प्रसिद्ध टीव्ही रिअलिटी शो बिग बॉस 9 चा विजेता प्रिन्स नरुलाचा भाऊ रुपेश नरुलाचा बुडून मृत्यू झाला. रुपेश प्रिन्सचा चुलत भाऊ आहे. तो कॅनेडामध्ये राहणारा होता. मीडिया रिपोर्टनुसार, रुपेशचा मृत्यू टोरंटो येथील स्कारबोरो येथे ब्लफर्स पार्क बीचवर बुडून झाला. रुपेश घरातून आपल्या मित्रांसोबत कॅनडा डे सेलिब्रेट करण्यासाठी गेला होता. तो टोरंटो येथील ब्लफर्स पार्क बीचवर मित्रांसोबत मजा मस्ती करत होता. दरम्यान, समुद्राच्या मोठ्या लाटा यायला सुरुवात झाली आणि रुपेश त्या लाटांमध्ये अडकला गेला.

विशेष म्हणजे रुपेशला पोहता येत नव्हतं तरी तो समुद्रात गेला होता. रुपेशचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. प्रिन्सचं संपूर्ण कुटुंब रुपेशच्या अंतिम संस्कारासाठी तातडीने कॅनडाला रवाना झाले. प्रिन्स हा प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आहे. त्याने बिग बॉसचा 9 वे पर्व जिंकले होते. याच घरात त्याची ओळख युविकाशी झाली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर दोघांनी एकमेकांना अनेक वर्ष डेट केलं. यानंतर गेल्या वर्षी 12 ऑक्टोबरला दोघांनी लग्न केलं. सध्या प्रिन्स नरुला एमटीव्ही रोडीज शोमध्ये व्यग्र आहे तर युविका चौधरीने काही सिनेमे साइन केले आहेत.

Bottlecapchallenge जे बॉलिवूडकरांना जमलं नाही ते स्वप्नील- अमृताने करून दाखवलं

स्वप्नील- अमृताच्या पावलांवर पाऊल ठेवत कुणालने केलं धम्माल Bottlecapchallenge

विराट- अनुष्काची इंग्लंड वारी, व्हायरल होतायेत PHOTO

VIDEO:आदेश बांदेकरांनी घेतलं माऊलीचं दर्शन, टाळ-मृदंगात केला हरिनामाचा गजर

First published: July 5, 2019, 6:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading