दरवर्षीप्रमाणे यंदाही बिग बॉसची धमाकेदार सुरुवात झाली आहे. आता स्पर्धकांनीही प्रेक्षकांना भुरळ पाडायला सुरुवात केली आहे.
बिग बॉस 16 मध्ये अनेक सेलिब्रेटी स्पर्धक सहभागी झाले आहेत. यामध्ये काही स्पर्धक प्रेक्षकांना नाराज करत आहेत. तर काहींनी प्रेक्षकांची पसंत मिळवली आहे.
यंदाच्या बिग बॉस सीजनमध्ये कझाकिस्तानचा गायक अब्दू रोजिकसुद्धा सहभागी झाला आहे. आपल्या निरागसपणाने अब्दूने सर्वांचं मन जिंकलं आहे. अब्दुला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.
अब्दू सध्या 19 वर्षांचा आहे. परंतु त्याला लहानपणापासूनच एका दुर्मिळ आजाराने ग्रासलं आहे. त्यामुळे त्यांची उंची वाढू शकली नाही. शारीरिक कमतरता असूनही आज तो जगभरात लोकप्रिय झाला आहे.
परंतु एक काळ असा होता की, त्याच्या उंचीवरुन त्याला हिणवलं जायचं. नुकतंच अब्दूने याबाबत बिग बॉसमध्ये खुलासा केला आहे.
नुकतंच एका एपिसोडमध्ये निराश एमसी स्टॅनला धीर देत अब्दूने अतिशय खास अंदाजात त्याला काही गोष्टी समजावल्या. तसेच आपल्या आयुष्यातील कठीण काळाबाबतही सांगितलं.
यावेळी अब्दूने सांगितलं की, सुरुवातीला लोक सोशल मीडियावर मला प्रचंड ट्रोल करत होते. माझी थट्टा करत होते. परंतु तेव्हासुद्धा मी आयुष्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवला होता आणि आजही तेच करतो.
अब्दूने पुढे सांगितलं की, मला पैसा आणि प्रसिद्धी नकोय. इन्स्टाग्रामवर अनेक लोक येतात. मला वाईट वाईट कमेंट्स करतात. कोणी मला कचरा म्हणत असे, तर कोणी माझा काहीही उपयोग नसल्याचं सांगत असे. परंतु मी सकारात्मक राहत असे. आज अब्दू रोजिक एक प्रसिद्ध सेलिब्रेटी बनला आहे. त्याला लोकांचं प्रचंड प्रेम मिळत आहे.