मुंबई, 8 ऑक्टोबर : ‘बिग बॉस मराठी सीझन 4’ सुरु झाला आहे. 2 ऑक्टोबरपासून सोशल मीडियावर याचीच चर्चा पहायला मिळतेय. बिग बॉस सुरु झाल्यापासून घरातील सदस्यांमध्ये खूप वाद-विवाद होत आहे. सोबतच मस्तीही पहायला मिळतेय. दरवर्षीप्रमाणं यंदाही कॅप्टन्सीसाठी टास्क पार पडला. टीम B कोणकोणत्या सदस्यांकडून उमेदवारीची संधी हिरावून घेणार आणि कोण ठरणार पहिल्या कॅप्टन्सी कार्यचे उमेदवार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर कॅप्टन झालेल्या सदस्याचं नाव समोर आलं. आहे. बिग बॉसच्या घरातील पहिली कॅप्टन झालीये समृद्धी जाधव. समृद्धीला यंदाच्या सीझनचं पहिलं कॅप्टन पद मिळाल्यानं तिचे चाहते खूप आनंदी आहेत. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. या भागात पाहुणा म्हणून अभिनेता श्रेयस तळपदे पोहोचला होता. त्याच्या ‘आपडी थापडी’ सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी तो या बिग बॉस 4 च्या सेटवर पोहोचला होता. त्यावेळी त्यानं सांगितलं की, बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादी महिला स्पर्धक पहिली कॅप्टन झाली आहे.
बिग बॉस मराठी 4 च्या घरामध्ये चान्स पे डान्स या उपकार्यात टीम A विजयी ठरली. टीम A ने चौथ्या सिझनच्या पहिल्या साप्ताहिक कार्यात विजय मिळवला. साप्ताहिक कार्यात विजयी ठरल्याने टीम A मधील सदस्यांना पहिल्या आठवड्यातील कॅप्टन पदाची उमेदवारी मिळवण्याची संधी मिळाली. कॅप्टन्सीपदाच्या शेवटची लढत तेजस्वी लोणारी आणि समृद्धी जाधवमधे झाली आणि समृद्धीनं हे टास्क जिंकत घराची पहिली कॅप्टन बनली.
दरम्यान, श्रेयशने या भागात पाहुणा म्हणून हजेरी लावली होती. त्याचा प्रोमो पाहून अनेकजण उत्साही झाले होते की तोही बिग बॉसमध्ये सहभागी होणार. मात्र तो त्याच्या आगामी चित्रपचाच्या प्रमोशनसाठी आला होता.