मुंबई, 11 ऑक्टोबर : बिग बॉस मराठीच्या माध्यमातून घराघरांत पोचलेल्या अमरावतीच्या शिव ठाकरे चे संपूर्ण महाराष्ट्रात असंख्य चाहते आहेत. एका सर्वसाधारण कुटुंबातून आलेल्या परंतु मोठी स्वप्ने असलेल्या शिव ठाकरेने बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात सहभागी होऊन संपूर्ण महाराष्ट्रातील चाहत्यांचे प्रेम मिळवले. शिव ठाकरेने यापूर्वी रोडीज या रिऍलिटी शो मध्येही भाग घेतला होता आणि स्वतःचे वेगळे स्थान तयार करीत सर्वांना हे दाखवून दिले होते की तो किती मेहनती तसेच खमका आहे.म्हणूनच बिग बॉस हिंदी च्या सोळाव्या पर्वात जेव्हा शिव ठाकरे सहभागी होणार ही बातमी कळली तेव्हापासून त्याच्या नावाची सगळीकडे चर्चा होतेय. बिग बॉसच्या घरातील सदस्यांपैकी सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय सदस्यांमध्ये शिवचे नाव घेतले जात आहे. आता आपल्या लाडक्या शिवला समर्थन देण्यासाठी त्याचे चाहते रस्त्यांवर उतरून रॅली काढत आहेत व शिवला असणारा पाठिंबा जाहीर करत आहेत. दुर्दैवाने बिग बॉसच्या पहिल्याच आठवड्यात शिवचे नाव नॉमिनेट झाले होते. बिग बॉसचे हे पर्व सुरु झाल्यापासून शिवचे नाव सोशल मीडिया बरोबरच ट्विटरवरही ट्रेंडिंग आहे आणि शिवला सध्या त्याच्या चाहत्यांकडून भरभरून प्रेम व पाठिंबा मिळतो आहे. हेही वाचा - Bigg Boss Marathi: शिव आणि वीणा या लव्ह बर्ड्सचं पुढे काय झालं? अभिनेत्रीचं उत्तर ऐकून बसेल धक्का
It's been only first week of #BB16 but look at the fan following of #ShivThakare.
— Bigg Boss Critic (@TheBiggBossBoyz) October 9, 2022
Told u all that Shiv is loved by neutrals more. Rally conducted in Amravati district of Maharashtra for Shiv today.
SHIV THAKARE WINNING HEARTS#BiggBoss16 #PratikSehajpal #TejasswiPrakash pic.twitter.com/iw0INU4DlT
Bike Rally for Shiv Thakare in Amravati
— 𝗦𝗵𝗶𝘃 𝗧𝗵𝗮𝗸𝗮𝗿𝗲⁹𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗙𝗖™ (@ShivThakareFC) October 9, 2022
SHIV THAKARE WINNING HEARTS pic.twitter.com/YQlkJdKXs8
नुकत्याच झालेल्या वीकेंड का वॉर मध्ये सलमान खानने देखील शिवच्या खेळाची स्तुती केली आणि म्हटले की जेव्हा जेव्हा लोक त्याच्याविषयी काही नकारात्मक टिप्पणी करतात किंवा त्याला लक्ष्य करतात तेव्हा शिव आक्रमक प्रतिक्रिया न देता शांतपणे त्या सगळ्याला सामोरा जातो. त्यावर शिवने जी लक्षणीय प्रतिक्रिया दिली, त्यामुळे त्याने त्याच्या चाहत्यांची व प्रेक्षकांचीही मने जिंकून घेतली. शिव म्हणाला की ," सर माझा आवाज काही दाबून टाकलेला वगैरे अजिबात नाहीये. फक्त मला हा विषय ताणण्यात काही रस नाही. कारण गेल्या चार पाच दिवसांत नॉमिनेशनवरून घरांत खूप भांडणे व वाद झालेत. त्यानंतर घरातील वातावरण फारच बदलले आहे."
शिवने असेही सांगितले की सलमान खान कडे बघूनच त्याला बॉडीबिल्डिंगची प्रेरणा मिळाली आहे. बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी शिवने एका मीडिया हाऊसशी बोलताना सांगितले होते की लॉकडाऊनमुळे त्याला बिग बॉस मराठीमुळे मिळालेल्या प्रसिद्धीचा काहीच फायदा करून घेता आला नाही. पण आता बिग बॉसच्या सोळाव्या पर्वात सहभागी झाल्यानंतर त्याचा करियरसाठी काहीतरी चांगला फायदा व्हावा अशी त्याची इच्छा आहे.