मुंबई, 16 नोव्हेंबर : बॉलिवूडमधील सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आलिया भट्ट आई झाली असून तिनं नुकताच मुलीला जन्म दिलाय. कपूर कुटुंबात नातीचं आगमन झालं आहे. भट्ट आणि कपूर दोन्ही कुटुंबासाठी हा दिवस खूप खास ठरला. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या वर्षी एप्रिलमध्ये विवाहबद्ध झाले होते. त्यानंतर आता पुन्हा दोघांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आला आहे. लेकीचे पालक झालेल्या आलिया आणि रणबीरवर चाहते तसंच सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे. तसंच आलियानं देखील तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आता लेकीच्या जन्मानंतर रणबीर कपूर पुन्हा कामाला लागला आहे. पण सध्या आलिया आणि रणबीरच्या मुलीचं नाव काय असणार याची चर्चा सुरु झालीये. आलिया आणि रणबीरने प्रायव्हसी लक्षात घेऊन बाळाला भेटणाऱ्या आणि फोटो काढणाऱ्यांसाठी काही नियम केले आहेत. त्यांची खूपच चर्चा झाली. अशा परिस्थितीत आता बातमी समोर आली आहे की, आलिया-रणबीरने बाळाचे नाव फायनल केले आहे. मुलीच्या नावाचा कपूर कुटुंबाशी खास संबंध असणार आहे.आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या बाळाचे नाव आणि त्याची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अलीकडेच बॉलीवूड लाईफचा एक रिपोर्ट समोर आला आहे ज्यानुसार लवकरच आलिया भट्ट-रणबीर कपूरच्या बाळाचे नाव फायनल झाले आहे आणि ते लवकरच त्याची घोषणा करू शकतात. रिपोर्टनुसार, बाळाच्या नावाचा संबंध रणबीर कपूरचे वडील ऋषी कपूर यांच्या नावाशी आहे. हेही वाचा- HBD Aditya Roy Kapur: ‘आशिकी 2’च्या आधी ‘या’ चित्रपटात झळकलाय आदित्य रॉय कपूर; वाचून वाटेल आश्चर्य रिपोर्टनुसार, आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची ही विचारसरणी जाणून घेतल्यानंतर नीतू कपूर भावूक झाल्या आहेत. बाळाच्या आगमनाने नीतू कपूर खूप खूश झाल्या होत्या. आता आलिया आणि रणबीरने ऋषी कपूर यांच्याशी खास कनेक्शन असणारं नाव ठरवल्यानंतर तर त्या खूपच खुश झाल्या आहेत. आलियाची एक जुनी मुलाखत सध्या व्हायरल होत आहे. त्यात तिने तिच्या आवडत्या नावाचा उल्लेख केला आहे. आता आलिया तिच्या मुलीचेही तेच नाव ठेवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आलियाने 2019 साली एका रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये सांगितले होते की, जर तिला भविष्यात मुलगी झाली तर ती तिचे नाव काय ठेवेल. आलिया भट्ट तिच्या ‘गली बॉय’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘सुपर डान्सर 3’ च्या सेटवर रणवीर सिंगसोबत आली होती. या शोमध्ये सक्षम शर्मा नावाच्या स्पर्धकाला रणवीर सिंगच्या नावाचे स्पेलिंग विचारण्यात आले तेव्हा त्याने चुकीचे स्पेलिंग सांगितले. यासोबतच सक्षम शर्माने आलिया भट्टच्या नावाचे स्पेलिंग ‘ALMAA’ असे केले, जे ‘ALMA’ असे वाचले जाईल. आलियाला हे नाव इतकं आवडलं की, भविष्यात जर ती मुलीची आई झाली तर तिला तिचे नाव अल्मा ठेवायचे आहे, असे तिने सांगितले. पण आता खरंच हे जोडपं लेकीचं नाव काय ठेवणार याची सर्वांना उत्सुकता आहे.