Alia Bhatt: आई बनण्यात आलियाने मोडला सासूचा रेकॉर्ड; लग्नानंतर 6 महिन्यांतच दिला मुलीला जन्म
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यावर्षी एप्रिलमध्ये लग्नाच्या बेडीत अडकले होते. १५ एप्रिल रोजी त्यांनी लग्न केलं होतं. विशेष म्हणजे लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांनंतर, या अभिनेत्रीने इन्स्टाग्राम अकाउंटवर सोनोग्राफी रुममधील फोटोशेअर करून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. आता आलिया भट्ट आई बनल्याची गोड बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यावर्षी एप्रिलमध्ये लग्नाच्या बेडीत अडकले होते. १५ एप्रिल रोजी त्यांनी लग्न केलं होतं.
2/ 9
विशेष म्हणजे लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांनंतर, या अभिनेत्रीने इन्स्टाग्राम अकाउंटवर सोनोग्राफी रुममधील फोटोशेअर करून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. या फोटोद्वारे तिने आपल्या चाहत्यांना प्रेग्नेंसीची गोड बातमी दिली होती.
3/ 9
आलियाने हा गोड फोटो शेअर करत लिहिलं होतं की - "आमचं बाळ लवकरच येणार आहे." ही पोस्ट समोर येताच जोरदार व्हायरल झाली होती. चाहते आणि सेलिब्रेटींनी या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. ही बातमी ऐकून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता.
4/ 9
आता आलिया भट्ट आई बनल्याची गोड बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी ही माहिती दिली आहे.
5/ 9
आज सकाळी तिला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिने मुलीला जन्म दिला असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे आता हे बॉलिवूडचे क्यूट कपल आता एका गोंडस मुलीचे पालक झाले आहेत.या बातमीमुळे कपुर घरात आनंदाचं वातावरण आहे.
6/ 9
आलियाने दिलेल्या या बातमीमुळे चाहते देखील आनंदात आहेत. सगळीकडून या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे.
7/ 9
लोकांनी सोशल मीडियावर एकमेकांना शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे. हॉस्पिटलमध्ये आलियाला भेटायला आलियाची आई सोनी राजदान आणि नितू कपूर देखील पोहोचल्या आहेत.
8/ 9
आता आलिया आणि रणबीर दोघांनी देखील बाळासाठी चित्रपटसृष्टीतून १ वर्षांचा ब्रेक घेतला आहे.
9/ 9
तुम्हाला हे जाणून अधिक आश्चर्य वाटेल की आलिया भट्टची सासू नीतू कपूरने देखील तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला तेव्हा तिच्या लग्नाला 9 महिनेही पूर्ण झाले नव्हते.