मुंबई, 06 नोव्हेंबर : बॉलिवूडमधील सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आई झाली असून तिनं नुकताच मुलीला जन्म दिलाय. कपूर कुटुंबात नातीचं आगमन झालं आहे. भट्ट आणि कपूर दोन्ही कुटुंबासाठी हा दिवस खूप खास ठरला आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या वर्षी एप्रिलमध्ये विवाहबद्ध झाले होते. त्यानंतर आता पुन्हा दोघांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आला आहे. लेकीचे पालक झालेल्या आलिया आणि रणबीरवर चाहते तसंच सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. तसंच आलियानं देखील तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आता आलिया भट्टच्या मुलीचं नाव काय असणार याची चर्चा सुरु झालीये.
रणबीर आणि आलीयाच्या मुलीची झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक झाले असून त्यांच्या लेकीचं नाव ते काय ठेवणार याच्या चर्चा रंगत आहेत. अशातच आलियाची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. त्यात तिने तिच्या आवडत्या नावाचा उल्लेख केला आहे. आता आलिया तिच्या मुलीचेही तेच नाव ठेवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - Alia Bhatt: लग्नाच्या सातव्या महिन्यातच आलियाच्या घरी हलला पाळणा; कुजबुज अन् शुभेच्छा एकत्रच!
दरम्यान, आलियाने 2019 साली एका रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये सांगितले होते की, जर तिला भविष्यात मुलगी झाली तर ती तिचे नाव काय ठेवेल. आलिया भट्ट तिच्या 'गली बॉय' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'सुपर डान्सर 3' च्या सेटवर रणवीर सिंगसोबत आली होती. या शोमध्ये सक्षम शर्मा नावाच्या स्पर्धकाला रणवीर सिंगच्या नावाचे स्पेलिंग विचारण्यात आले तेव्हा त्याने चुकीचे स्पेलिंग सांगितले. यासोबतच सक्षम शर्माने आलिया भट्टच्या नावाचे स्पेलिंग 'ALMAA' असे केले, जे 'ALMA' असे वाचले जाईल. आलियाला हे नाव इतकं आवडलं की, भविष्यात जर ती मुलीची आई झाली तर तिला तिचे नाव अल्मा ठेवायचे आहे, असे तिने सांगितले.
View this post on Instagram
आता आज आलियाने एका गोंडस मुलीलाच जन्म दिला आहे. त्यानंतर आता आलियाचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आलिया आई झाल्यानंतर आज हा एपिसोड पुन्हा चर्चेत आला. आता आलिया खरंच तिच्या मुलीचे नाव 'अल्मा' ठेवते की आणखी काही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आपल्या पहिल्या अपत्याच्या स्वागतासाठी प्रचंड उत्सुक होते. या दोघांनी आधीपासूनच बाळाच्या स्वागताची संपूर्ण तयारी केली होती. आलिया आणि रणबीरने या काळात बाळाच्या संगोपनासाठी अनेक पुस्तकेसुद्धा वाचली होती. दरम्यान आता मुलीच्या जन्माने भट्ट आणि कपूर कुटुंबात जल्लोष होत आहे. एकेएक करत सर्व कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये दाखल होता आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.