जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Akshay Kumar: अक्षय कुमारनं चक्क घागरा घालून लगावले ठुमके; नेटकरी म्हणाले, 'फ्लॉप सिनेमांमुळं...'

Akshay Kumar: अक्षय कुमारनं चक्क घागरा घालून लगावले ठुमके; नेटकरी म्हणाले, 'फ्लॉप सिनेमांमुळं...'

अक्षय कुमार

अक्षय कुमार

अक्षय कुमारच्या ‘द एंटरटेनर्स टूर’चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अक्षयचा हा व्हिडीओ पाहून चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 04 मार्च : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अभिनेता अक्षय कुमार ची जादू सध्या बॉक्स ऑफिसवर फिकी पडली आहे. त्याचे  गेल्या दीड वर्षांपासून प्रदर्शित झालेले एक सो एक  चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून आपटले आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘सेल्फी’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे. सध्या अक्षय कुमार त्याच्या ‘द एंटरटेनर्स टूर’साठी अमेरिकेत आहे. या टूरमध्ये अक्षय कुमारसोबत नोरा फतेही, मौनी रॉय, सोनम बाजवा, दिशा पटनी यांच्यासह अनेक स्टार्स आहेत. दरम्यान, बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार 27 फेब्रुवारीलाच अमेरिकेला रवाना झाला. अभिनेता बॉलिवूडच्या या सुंदरींसोबत अमेरिकेतील सर्व शहरांमध्ये परफॉर्म करणार आहे. ही माहिती त्यानेच सोशल मीडियावर दिली आहे. 3 मार्चला अटलांटा, 8 मार्चला डॅलस, 11 मार्चला ओरलँडो आणि 12 मार्चला ऑकलंडमध्ये अक्षय या अभिनेत्रींनसह लाइव्ह परफॉर्मन्स सादर करणार असल्याची माहिती आहे. अक्षयने तेथील स्थानिक भारतीय नागरिकांना त्यात सामील होण्याचं आवाहन केलं होतं. अक्षयचा आता अशाच एका शहरात लाईव्ह परफॉर्मन्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अभिनेत्याने चक्क घागरा घालून डान्स केलेला दिसत आहे. Prajakta Mali: शाहरुखच्या ‘स्वदेस’ मध्ये प्राजक्ता माळीने साकारलीये ‘ही’ भूमिका; विश्वास बसला नसेल तर पाहा फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी शनिवारी आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार घाघरा घालून नाचताना दिसत आहे. त्यानंतर नोरा फतेही अक्षय कुमारसोबत येते आणि ते एकत्र ‘मैं अनारी तू खिलाडी’वर नृत्य करतात. अक्षय कुमारचा हा डान्स परफॉर्मन्स अमेरिकेतील ‘द एंटरटेनर्स टूर’ दरम्यानचा आहे. अक्षय कुमारच्या या व्हिडिओला चाहत्यांनी पसंती दिली आहे.पण त्याचबरोबर सोशल मीडियावर नेटकरी त्याला जोरदार ट्रोल देखील  करत आहेत.

जाहिरात

एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘फक्त हे बघायचे बाकी होते.’ एका यूजरने लिहिले आहे की, ‘जेव्हा तुम्हाला चित्रपटातून पैसे मिळत नाहीत तेव्हा अशा प्रकारे पैसे कमवा.’  तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने, ‘चित्रपट फ्लॉप झाला, आता फक्त एवढंच बघायचं बाकी राहिलं होतं.’ अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

अक्षय कुमारच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्याकडे अनेक चित्रपट आहेत. अक्षय कुमार ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘ओएमजी 2’ चित्रपट, ‘गोरखा’ चित्रपट, ‘कॅप्सूल गिल’ चित्रपटात काम करताना दिसणार आहे. अक्षय कुमारचा या वर्षात प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट सेल्फी तर बॉक्स ऑफिसवर काही कमाई करू शकला नाही. त्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटांकडून सगळ्यांनाच आशा आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात