मुंबई, 17 फेब्रुवारी : बॉलिवूड खिलाडी कुमार सध्या त्याच्या आगामी 'सेल्फी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षय कुमार या चित्रपटात पहिल्यांदाच इमरान हाश्मीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. मागच्या वर्षात अक्षय कुमारचे एकापाठोपाठ एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले आहेत. त्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटाकडून सगळ्यांनाच खूप अपेक्षा आहेत. हा चित्रपट हिट होण्यासाठी अक्षय सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तो या सिनेमाचं प्रमोशन करत आहे. 'सेल्फी' च्या प्रमोशनसाठी अक्षय कधी मेट्रोमध्ये प्रवास करताना तर कधी काही स्टार्ससोबत सेल्फी घेताना दिसत आहे. पण एवढ्या सगळ्यात बॉलिवूडचे सगळे स्टार्स प्रमोशनसाठी ज्या शो मध्ये जातात तिथे जायला अक्षयने मात्र नकार दिला आहे.
'द कपिल शर्मा शो' हा असा एक कॉमेडी शो आहे, जो प्रत्येक घराघरात लोकप्रिय आहे. या शो मध्ये प्रमोशनसाठी प्रत्येक अभिनेता कायम उत्सुक असतो. या शोचा प्रत्येक भाग हिट होत असतो. चित्रपटाला देखील शो मध्ये प्रमोशन केल्याचा चांगला फायदा मिळतो. तसेच अक्षय कुमारने देखील त्याच्या आतापर्यंतच्या प्रत्येक चित्रपटाचं प्रमोशन कपिल च्या शो मध्ये केलं आहे. मात्र सेल्फीच्या प्रमोशनसाठी कपिल च्या शो मध्ये जाण्यास मात्र त्याने नकार दिला आहे. त्याच कारण आता समोर आलं आहे.
हेही वाचा - Samantha Ruth Prabhu: 'पुष्पा 2' मध्ये पुन्हा दिसणार समंथाच्या अदांचा जलवा? समोर आली मोठी अपडेट
चित्रपट समीक्षक केआरकेने नुकतेच याबाबत ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये कमाल आर खानने अक्षय कुमार 'द कपिल शर्मा शो'मध्ये जाणार नसल्याची माहिती शेअर केली आहे.
या ट्विटमध्ये केआरकेने लिहिलंय की, 'अखेर अक्षय कुमारने कपिल शर्मा शोमध्ये सेल्फीचं प्रमोशन न करण्याचा निर्णय घेऊन चांगले काम केले आहे. द कपिल शर्मा शो हा अक्षयसाठी पनौती असल्याचे त्याला समजले आहे.' अक्षय कुमार कपिल शर्मा शोमध्ये जाणार नाही का केआरकेचे हे ट्विट खरे आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी स्टारर चित्रपट २४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. 'सेल्फी' हा पृथ्वीराज सुकुमार यांच्या सुपरहिट मल्याळम चित्रपट 'ड्रायव्हिंग लायसन्स'चा रिमेक आहे. चित्रपटाची कथा एका सामान्य माणसाभोवती फिरते जो आपल्या मुलासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतो. चित्रपटाच्या रिलीज झालेल्या ट्रेलरने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.