प्राजक्ता माळीने छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून ती घराघरात पोहचली होती.
पण त्याआधी ही अभिनेत्री चक्क शाहरुख खानच्या गाजलेल्या सिनेमात झळकली होती. नुकतंच प्राजक्ताने याविषयी खुलासा केला आहे.
या सिनेमात मुख्य हिरोईनच्या मागे धावताना रस्त्यावर शाहरुख एका मुलीला धडकतो आणि ती मुलगी म्हणजे आजची आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी आहे.