मुंबई, 18 मार्च: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या एका चित्रपटाची तुफान चर्चा आहे तो म्हणजे ‘ हेरा फेरी 3 ’. अक्षय कुमार , परेश रावल, सुनील शेट्टी या त्रिकुटाच्या हेरा फेरी चित्रपटाने एक काळ गाजवला. आजही हा चित्रपट अनेक लोकांचा आवडता आहे. आता लवकरच या चित्रपटाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून नुकतंच या सेटवरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता या चित्रपटाच्या समोर एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. एका वेगळ्याच कारणामुळे हेरा फेरी 3 चर्चेत आला आहे. ‘हेरा फेरी 3’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. मध्यंतरी या चित्रपटातील अक्षय कुमारची जागा कार्तिक आर्यन घेणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र प्रेक्षकांच्या प्रचंड मागणीमुळे अक्षय कुमारच या चित्रपटात राजू च्या भूमिकेत दिसणार आहे. पण चित्रपटातील एका गोष्टीवर प्रेक्षक नाराज असून त्यांनी अक्षय कुमारलाच पत्र लिहिलं आहे. संपूर्ण टीमसमोरच नूतनने ‘या’ सुपरस्टारला मारलेली कानाखाली, धक्कादायक होतं कारण सध्या मात्र सोशल मीडियावर या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला विरोध होताना दिसत आहे. ‘हेरा फेरी ३’चं दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहे. फरहाद सामजी यांचे आधीचे चित्रपट आणि लेखन पाहता चाहत्यांना ते दिग्दर्शक म्हणून नको असल्याचं स्पष्ट होत आहे, यामुळेच फरहाद सामजी यांना ‘हेरा फेरी ३’मधून काढून टाकण्यात यावे याची मागणी सोशल मीडियावर होताना दिसत आहे.
An open letter to @akshaykumar sir on the behalf of all Akkians to change the director of our iconic movie #HeraPheri3. We know just because of us you signed the movie agan so please reconsider the decision of the director.
— Shivam (@PredictionSmp) March 17, 2023
REMOVE FARHAD FROM HERAPHERI pic.twitter.com/OClPjbuzNO
फरहाद सामजीचा नवीन शो ‘पॉप कौन?’ डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. हा शो पाहिल्यानंर काही तासांनीच प्रेक्षकांनी “हेराफेरीतुन फरहादला काढा” अशी मागणी ट्विटरवर केली आहे. लोक आपला राग दिग्दर्शकावर काढत आहेत आणि अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांच्या ‘हेरी फेरी 3’ मधून या दिग्दर्शकाला काढण्याची मागणी करत आहेत. हा चित्रपट चांगला असावा अशी प्रेक्षकांची इच्छा आहे. अक्षय कुमारचा सुपरफ्लॉप ठरलेला ‘बच्चन पांडे’ हा चित्रपटही फरहाद यांनीच दिग्दर्शित केला होता. एकूणच त्यांचे फ्लॉप चित्रपट लिखाण यामुळे त्यांना विरोध होताना दिसत आहे. फरहाद सामजी ऐवजी मूळ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांना परत आणावं अशी मागणी लोक करत आहेत.b
‘हेरा फेरी 3’ हा या चित्रपटाच्या हिट मालिकेचा तिसरा भाग आहे. अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांची आयकॉनिक जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि सरप्राईज म्हणजे संजय दत्त डॉनची भूमिका साकारणार आहे. याआधी अनीस बज्मी हा सिनेमा दिग्दर्शित करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण त्याच्या आणि निर्माता फिरोज नाडियादवाला यांच्यात काही जमलं नाही म्हणून हा चित्रपट फरहाद यांच्याकडे गेला.