मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /संपूर्ण टीमसमोरच नूतनने 'या' सुपरस्टारला मारलेली कानाखाली, धक्कादायक होतं कारण

संपूर्ण टीमसमोरच नूतनने 'या' सुपरस्टारला मारलेली कानाखाली, धक्कादायक होतं कारण

नूतन

नूतन

नूतन अतिशय सौम्य आणि शांत स्वभावाची होत्या. सेटवर सुद्धा सहकलाकारांशी त्यांचे कधीच मतभेद नव्हते. पण एके दिवशी असं काही घडलं की चित्रपटाच्या सेटवर नूतनने तिच्या सहकलाकाराला जोरदार कानाखाली मारली. नूतनला हे पाऊल का उचलावे लागले? यामागेही एक मोठी रंजक गोष्ट आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 18 मार्च : ज्येष्ठ अभिनेत्री नूतन या सर्वात अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक मानल्या जातात. चित्रपटसृष्टीतील चार दशकांच्या शानदार कारकिर्दीत त्या ७० हून अधिक चित्रपटांमध्ये दिसल्या. 70 च्या दशकात आपल्या चित्रपटांद्वारे लोकांची मने जिंकणारी अभिनेत्री नूतनने 5 वेळा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकून विक्रम केला आहे. नूतन या हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली महिला सुपरस्टार मानल्या जातात. नूतनने त्यांच्या शानदार कारकिर्दीत 'सुजाता', 'बंदिनी', 'मिलन', 'मैं तुलसी तेरे आंगन की', 'अनाडी', 'छलिया', 'तेरे घर के सामने' आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

नूतन अतिशय सौम्य आणि शांत स्वभावाची होत्या. सेटवर सुद्धा  सहकलाकारांशी त्यांचे  कधीच मतभेद नव्हते. पण एके दिवशी असं काही घडलं की चित्रपटाच्या सेटवर नूतनने तिच्या सहकलाकाराला जोरदार कानाखाली मारली. तो अभिनेता दुसरा कोणी नसून संजीव कुमार होता. नूतनला हे पाऊल का उचलावे लागले? यामागेही एक मोठी रंजक गोष्ट आहे.

करिअर यशाच्या शिखरावर अन् विनोद खन्ना यांनी घेतला ओशोंचा आश्रय; पत्नी, लेकरांना सोडलं वाऱ्यावर

नूतन आणि संजीव कुमार हे चित्रपटसृष्टीतील अजरामर कलाकार आहेत.  संजीव कुमारची फिल्मी पार्श्वभूमी काहीच नव्हती. त्याने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले. त्याच वेळी, नूतनची आई अभिनेत्री होती आणि तिचे वडील प्रसिद्ध कवी आणि दिग्दर्शक होते. कमी वयातच नूतनने चित्रपटसृष्टीत पाउल ठेवलं होतं. चित्रपटांमध्ये ती सेटल झाली तोपर्यंत ती विवाहित होती आणि एका मुलाची आईही झाली होती.

1959 मध्ये नूतनने नौदल अधिकारी रजनीश बहलसोबत लग्न केले. लग्नानंतर तिने चित्रपटांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला, परंतु मुलगा मोहनीश बहलच्या जन्मानंतरही तिला अधिकाधिक चित्रपट मिळत होते, त्यामुळे नूतनने पुन्हा चित्रपट करण्यास सुरुवात केली. 1969 मध्ये नूतन संजीव कुमार यांच्या देवी या चित्रपटाचे शूटिंग करत होत्या. ती स्वभावाने शांत आणि गंभीर होती. शूटिंगदरम्यान तिने संजीव कपूरशी बोलणे सुरू केले आणि दोघेही चांगले मित्र बनले.

तेव्हा नूतनचे आधीच लग्न झाले होते आणि ती एका मुलाची आई देखील होती. एके दिवशी 'देवी' चित्रपटाच्या सेटवर नूतनची नजर एका मॅगझिनवर गेली. त्याच्या माध्यमातून नूतनलाही तिच्या आणि संजीव कुमारच्या अफेअरबद्दल माहिती मिळाली. नूतनला हे अजिबात आवडले नाही. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा तिला कळले की संजीव कुमार यांनी ही अफवा पसरवली आहे, तेव्हा त्यांच्या रागाची सीमा राहिली नाही. नूतनला इतका राग आला की तिने सेटवरच संजीव कुमारला कानाखाली लगावली होती.

नूतन यांनी 1972 मध्ये एका मुलाखतीदरम्यान याचा उल्लेख केला होता. पत्रकार उमा राव यांच्याशी बोलताना त्यांनी आपली बाजू मांडली. तिने पत्रकाराला सांगितले होते की तिच्या जवळच्या एका स्रोताने कळले की संजीव कुमारने तिच्या नात्याबद्दल बातमी पसरवली होती की ती त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि त्याच्याशी लग्न करण्याचा विचार करत आहे. पत्रकाराचे हे ऐकून नूतन म्हणाली होती, 'हा सगळा मूर्खपणा आहे! मी त्याच्यासाठी माझा चांगला नवरा सोडेन असे कोणाला का वाटले? संजीवला  माझ्या नवऱ्याच्या पायाच्या नखाचीही किंमत नाही.' असे त्या म्हणाल्या होत्या. तसेच आपल्या कृत्याबद्दल आपल्याला कोणताही पश्चाताप नाही, असेही नूतनने म्हटले होते. कानाखाली मारल्यानंतर दोघांमध्ये खडाजंगी झाली, पण त्यांनी कामाच्या दरम्यान हा तणाव येऊ दिला नाही.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News