मुंबई, 26 फेब्रुवारी: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या एका चित्रपटाची तुफान चर्चा आहे तो म्हणजे ‘हेरा फेरी 4’. नुकतंच अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी या त्रिकुटाच्या हेरा फेरी चित्रपटाने एक काळ गाजवला. आजही हा चित्रपट अनेक लोकांचा आवडता आहे. आता लवकरच या चित्रपटाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून नुकतंच या सेटवरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता या चित्रपटाबद्दल अजून एक माहिती समोर येत आहे. हेरा फेरी फ्रेंचाइजी चित्रपट ‘हेरा फेरी 4’ बद्दल नवीन माहिती समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. यातही अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल प्रेक्षकांना कॉमेडीचा जबरदस्त डोस देताना दिसणार आहेत. आता याबाबत आणखी एक नवीन बातमी समोर आली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढणार आहे. या चित्रपटात संजय दत्तची एंट्री झाली असून तो नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याचा दावा केला जात आहे. बायकोला पुरस्कार मिळताच सिद्धार्थने स्टेजवर धावत जात केलं असं काही; VIDEO व्हायरल संजय दत्तला ‘हेरा फेरी 4’ मध्ये कास्ट केल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात संजय दत्तची भूमिका निगेटिव्ह असणार आहे. यात संजय दत्त अंध व्यक्तीची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या व्यक्तिरेखेत एक ट्विस्ट आहे. संजय दत्तच्या एंट्रीमुळे हा चित्रपट अधिक रंजक होणार आहे. श्याम, राजू आणि बाबूराव यांच्यासोबत संजय दत्त कोणत्या युक्त्या खेळतो हे पाहावे लागेल! संजय दत्तने नेहमीच नकारात्मक भूमिका सशक्तपणे साकारल्या आहेत. गेल्या वर्षी तो ‘KGF 2’ मध्ये रॉकी भाई विरुद्ध दमदार फॉर्ममध्ये दिसला होता. त्याचबरोबर रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ या चित्रपटातही त्याने दमदार अभिनयानं कमाल केली होती. ‘शमशेरा’ची जादू चालु शकली नसली तरी सर्वांनी संजय दत्तचे कौतुक केले. आता पुन्हा एकदा तो नकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणार आहे. संजय दत्तशिवाय अर्शद वारसीही ‘हेरा फेरी 4’मध्ये दिसणार आहे अशीही बातमी आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘संजय दत्तने विनोदी भूमिकादेखील उत्तमरित्या निभावल्या आहेत. ‘हेरा फेरी’ युनिव्हर्समध्ये आणखी एक नवा ट्विस्ट आणि धमाल आणण्यासाठी निर्मात्यांनी घेतलेला हा निर्णय खूप योग्य आहे. फिरोज नाडियाडवाला यांच्या मुंबईतील एम्पायर स्टुडिओमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा श्री गणेशा करण्यात आला. मूळ ‘हेरा फेरी’ हा चित्रपट 2000 मध्ये प्रदर्शित झाला होता. 2006 मध्ये या फ्रेन्चायझीचा दुसरा चित्रपट ‘हेरा फेरी 2’ प्रदर्शित झाला. आता प्रेक्षक ‘हेरा फेरी 4’ची आतुरतेने वाट बघत आहेत. ‘हेरा फेरी 4’ बद्दल बोलायचे झाले तर, बॉलिवूड हंगामाच्या रीपोर्टनुसार या चित्रपटाचं नाव ‘हेरा फेरी ३’नसून ‘हेर फेरी ४’ आहे आणि यामागील कारण या नव्या प्रोमोमध्ये दडल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. या चित्रपटाचं शूटिंग पुढच्या तीन महिन्यात पूर्ण होणार असून या वर्षाच्या शेवटपर्यंत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.