मुंबई, 09 जुलै- कंगना रणौतची बहीण रंगोली चंडेलने वरुण धवन, तापसी पन्नू, अनुराग कश्यप, आलिया भट्ट, करण जोहर आणि अशा अनेक कलाकारांबद्दल अपशब्द वापरल्यानंतर आता पुन्हा एकदा हृतिक रोशनवर आपला मोर्चा वळवला आहे. नुकतंच हृतिकने कंगनाविरुद्धच्या वादावर एक मोठं वक्तव्य केलं होतं. यावर उत्तर म्हणून रंगोलीने पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्याच्याविरुद्ध बरच काही लिहिलं आहे. रंगोलीने ट्वीट करत म्हटलं की, ‘हे पाहा काकांनी पुन्हा सुरुवात केली. अरे चल पुढे जा.. दर थोड्या दिवसांनी इज्जत काढून घेण्याच्या डोसची सवय पडली आहे. तुझ्यासाठी आता माझ्याकडे कोणताच डोस नाही. फुट इकडून…’ काय म्हणाला होता हृतिक रोशन- सुपर ३० या आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनवेळी हृतिकला कंगनाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. याबद्दल बोलताना हृतिक म्हणाला की, मला हे आता कळून आलं आहे की, आपले पाय ओढणाऱ्यांसोबत एका ठरावीक वेळेनंतर संयमाने वागणं गरजेचं आहे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असं काही गरजेचं नाही. अशा गोष्टींचा स्वतःवर परिणाम करून घ्यायचा हे मी आता शिकलोय. त्या स्त्रीविरोधात मी कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही. कारण भारतात कोणत्याही मुलाचा पाठलाग केला जात नाही.
काय आहे वाद- कंगना रणौत आणि हृतिक रोशन यांचा वाद 2017 मध्ये सुरू झालेला. कंगनाने एका मुलाखतीदरम्यान हृतिकला ‘मुर्ख एक्स’ असं संबोधलं होतं. यानंतर हृतिकने कंगनाविरुद्ध 29 पानांची तक्रार दाखल केली होती. यात कंगना त्याला ईमेल करायची असंही त्याने म्हटलं होतं. रिपोर्टनुसार, हृतिकच्यावतीने त्याचा वकील महेश जेठमलानीने मुंबई क्राइम ब्रांचकडे तक्रार दाखल केली होती. हृतिकने त्याचा फोन आणि लॅपटॉपही पोलिसांना तपासणीसाठी दिला होता. हृतिकच्या वकिलांनी तक्रारीत असंही म्हटलं होतं की, कंगना सतत त्याचा पाठलाग करायची आणि तिने हृतिकला ‘इंटरनल लवर’ म्हटलं होतं. अक्षय कुमारच्या Mission Mangalचा टीझर पाहून फॅन म्हणाले, साहोसोबत रिलीज नको करू वर्ल्डकपनंतर तुमच्यासाठी आहे फक्त Entertainment Entertainment Entertainment जेव्हा निकच प्रियांकाचं असं फोटोशूट करतो EXCLUSIVE VIDEO: पुढचा बाण विधानसभेलाच लागला पाहिजे- सुरेखा पुणेकर