Home /News /entertainment /

सुशांतच्या आत्महत्येबाबत चौकशीला वेगळे वळण, एकाच घटनेबाबत भन्साळी-चोप्रा यांचा वेगवेगळा जबाब

सुशांतच्या आत्महत्येबाबत चौकशीला वेगळे वळण, एकाच घटनेबाबत भन्साळी-चोप्रा यांचा वेगवेगळा जबाब

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येप्रकरणी यशराज फिल्मचे सर्वेसर्वा आदित्य चोप्रा (Aditya Chopra) आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali ) यांच्या जबाबामध्ये विरोधाभास पाहायला मिळतो आहे.

पुढे वाचा ...
    आशिष सिंह, मुंबई, 19 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येप्रकरणी यशराज फिल्मचे सर्वेसर्वा आदित्य चोप्रा (Aditya Chopra) आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali ) यांच्या जबाबामध्ये विरोधाभास पाहायला मिळतो आहे. एकाच मुद्द्यावर दोघांनीही वेगवेगळे जबाब दिले आहेत. आदित्य चोप्राची तीन ते चार तास चौकशी झाल्यानंतर त्याचा जबाब भन्साळींपेक्षा वेगळा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. बाजीराव मस्तानीसाठी सुशांतला कास्ट केले जाणार होते, अशी माहिती भन्साळींनी मुंबई पोलिसांना दिली होती. दरम्यान त्यावेळी सुशांत YRF बरोबर काँट्रॅक्टमध्ये बांधिल होता आणि आम्ही YRF शी बातचीत केली मात्र पुढे याबाबात काही शक्य झाले नाही, अशी प्रतिक्रिया भन्साळींनी दिली होती. शनिवारी आदित्य चौप्राची चौकशी झाल्यावर त्याची प्रतिक्रिया याउटल होती. सुशांत सिंह राजपूतला बाजीराव मस्तानीमध्ये कास्ट करण्यासंदर्भात संजय लीला भन्साळींनी वायआरएफशी (Yash Raj Films) कोणतीही बातचीत केली नव्हती. जर सुशांत YRF बरोबर काँट्रॅक्ट असताना 'एम एस धोनी' हा चित्रपट करू शकतो तर बाजीराव मस्तानी का नाही करू शकत. मात्र यासंदर्भात अशी कोणतीच बातचीत झाली नव्हती. असा जबाब आदित्य चोप्रांनी दिला आहे. (हे वाचा-रिया चक्रवर्तीला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल,दिली होती धमकी) आदित्य चोप्राच्या मते, 'याचप्रमाणे 'रामलीला' या चित्रपटावेळी देखील हा आरोप लावण्यात आला आहे की, वायआरएफने काँट्रॅक्टमध्ये बांधिल असणाऱ्या सुशांतला हा सिनेमा करू दिला नाही मात्र YRFशीच काँट्रॅक्ट असणाऱ्या रणवीर सिंहला हा सिनेमा करू दिला. यामध्ये सत्यता नाही आहे.' आदित्य चोप्राच्या मते, 'रणवीर सिंहने एप्रिल 2012 मध्येच 'रामलीला' साइन केला होता आणि सुशांत सिंह नोव्हेंबर महिन्यात YRF च्या काँन्ट्रॅक्टमध्ये आला होता. त्यामुळे हा प्रश्नच निर्माण होत नाही.' आदित्य चोप्राने 'पानी' सिनेमा बंद झाल्यामुळे सुशांत नैराश्यात गेल्याच्या वृत्ताबद्दलही भाष्य केले. 2012 मध्ये शेखर कपूर आणि आदित्य चोप्रा यांनी पानी हा सिनेमा बनवण्यास सुरुवात केली होती. आदित्य चोप्रा आणि शेखर कपूर यांनी मिळूनच या भूमिकेसाठी सुशांतचे नाव अंतिम केले होते, अशी माहिती आदित्य चोप्राने दिली. 2013 मध्ये त्याचे नाव मुख्य भूमिकेसाठी अंतिम करण्यात आले होते आणि 2014 मध्ये याचे शूटिंग सुरु होणार असल्याने सुशांत वर्कशॉपमध्ये व्यस्त होता. (हे वाचा-VIDEO : सुशांतने सर्वांसमोर केलं अंकिता लोखंडेला प्रपोज, तिने दिलं होतं हे उत्तर) 'पानी'साठी सुशांतच्या तारखा देखील बुक करण्यात आल्या होत्या, मात्र YRF ने यासंदर्भात शेखर कपूर किंवा सुशांतबरोबर कोणते काँट्रॅक्ट साइन केले नव्हते किंवा कोणताही व्यवहार झाला नव्हता, असे वक्तव्य देखील आदित्य चोप्राने केले आहे. 2015 मध्ये क्रिएटिव्ह मतभेदामुळे वायआरएफने या चित्रपटातून त्यांचे नाव मागे घेतले अशी माहिती त्याने दिली. आदित्य चोप्राच्या मते, 'राबता' चित्रपटात सुशांतच्या कास्टिंगबाबत बोलणे झाले होते. वायआरएफ क्रिएटिव्ह डिव्हिजनकडून याबाबत बोलणे झाले होते की हा सिनेमा सुशांतच करेल. याचा अर्थ असा होतो की, यशराजबाहेर काम करण्यासाठी सुशांतला कुणी अडवलं नव्हतं. 'फितूर' सिनेमासाठी देखील यशराजचा कोणताही हस्तक्षेप नव्हता तो चित्रपट स्वत: सुशांतने सोडला होता. यामागे कोणताही कट आहे असे दाखवण्यात येऊ नये, वायआरएफशी जोडलेल्या सर्व कलाकारांच्या क्षमतेला वाव देण्याचा प्रयत्न आम्ही करतो, असेही आदित्य चोप्रा मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हणाला आहे. (हे वाचा-दीपिका-प्रभास 'बिग बजेट' सिनेमात दिसणार एकत्र, नाव मात्र गुलदस्त्यात) आदित्य चोप्राने ही बाब पूर्णपणे नाकारली की, 'पानी'चे शूटिंग बद्द पडल्याने सुशांत नैराश्यात गेला होता. आदित्या चोप्राच्या जबाबाच्या मते, नोव्हेंबर 2015 मध्ये सुशांतचे काँट्रॅक्ट संपणार होते. यशराजकडून हे काँट्रॅक्ट रिन्यू करण्याचा पर्याय देखील सुशांतला देण्यात आला होता. आदित्य चोप्राने असे सांगितले की, याबाबत त्याने स्वत: सुशांतशी बातचीत केली होती आणि पानी बंद होण्यामागचे खरी समस्या त्याला सांगितली होती. त्याला भविष्यात चांगले प्रोजेक्ट मिळतील असे देखील मी त्याला समजावले असल्याचे आदित्य म्हणाला. मात्र सुशांत ते काँट्रॅक्ट वाढवू इच्छित नव्हता. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या संमतीने काँट्रॅक्ट संपवल्याचे आदित्य चोप्रा म्हणाला.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Sanjay Leela Bhansali, Sushant Singh Rajput, Yashraj films

    पुढील बातम्या