Home /News /entertainment /

दीपिका-प्रभास 'बिग बजेट' सिनेमात पहिल्यांदा दिसणार एकत्र, नाव मात्र गुलदस्त्यात

दीपिका-प्रभास 'बिग बजेट' सिनेमात पहिल्यांदा दिसणार एकत्र, नाव मात्र गुलदस्त्यात

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता प्रभासच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हे दोनही ताकदीचे कलाकार एकाच चित्रपटात दिसणार आहेत.

  मुंबई, 19 जुलै : अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता प्रभासच्या (Prabhas) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हे दोनही ताकदीचे कलाकार एकाच चित्रपटात दिसणार आहेत. काही दिवासांपासून दीपिका आणि प्रभास एका चित्रपटात दिसणार अशा चर्चांना उधाण आले होते. दरम्यान आता दीपिकाने चाहत्यांसाठी एक व्हिडीओ शेअर करत यावर शिक्कामोर्तब केले आहे. दिपिका अभिनेता प्रभास आणि दिग्दर्शक नाग अश्विन यांच्याबरोबर काम करणार आहे. वैजयंती मुव्हीजने याबाबत आधी पोस्ट केली होती की, चाहत्यांसाठी ते काहीतरी खास घेऊन येणार आहेत. त्यांनंतर त्यानी अशी पोस्ट केली आहे की 'वचन दिल्याप्रमाणे आम्ही आलो आहोत. एक मोठी घोषणा करत आहोत. WELCOMING THE SUPERSTAR' अशी पोस्ट त्यांनी केली आहे. #DeepikaPrabhas असा हॅशटॅग वापरून त्यांनी या नवीन प्रोजेक्टबाबत घोषणा केली आहे. दरम्यान दीपिकाने वैजयंती मुव्हीजची ही पोस्ट रिपोस्ट करत ती याबाबत किती उत्सूक आहे ते सांगितले आहे. (हे वाचा-मोडून पडला संसार...! आसाममध्ये पुराचा हाहाकार, मन हेलावून टाकणारे PHOTO)
  दरम्यान काही चाहत्यांनी या सिनेमाला 'प्रभास 21' असे नाव दिले आहे. सिनेमाबाबत घोषणा होण्याआधीच या दोघांचे नाव सोशल मीडियावर ट्रेंड होत होते. आता या प्रोजेक्टची घोषणा झाल्यानंत चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. दरम्यान काही मीडिया अहवालांच्या मते या सिनेमाचे शूटिंग पुढील वर्षी एप्रिलमध्ये सुरू होणार असून हा सिनेमा साधारण 2022 मध्यें प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. प्रभासच्या 'साहो' आणि 'बाहूबली' प्रमाणे हा देखील पॅन इंडिया प्रोजेक्ट असणार आहे. तेलुगू सिनेसृष्टीत दीपिकाचा हा डेब्यू चित्रपट असणार आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Deepika padukone, Prabhas

  पुढील बातम्या