VIDEO : सुशांतने सर्वांसमोर केलं अंकिता लोखंडेला प्रपोज, तिने दिलं होतं हे उत्तर

VIDEO : सुशांतने सर्वांसमोर केलं अंकिता लोखंडेला प्रपोज, तिने दिलं होतं हे उत्तर

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे काही जुने व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहेत. यामध्ये 'झलक दिखला जा' या रिऍलिटी शोच्या स्टेजवरील सुशांतचा एक व्हिडीओ खूपच लोकप्रिय होत आहे.

  • Share this:

मुंबई, 19 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh Rajput) जाऊन आता महिन्यापेक्षाही जास्त काळ लोटला आहे. तरी देखील त्याचे चाहते, कुटुंबीय, सहकलाकार, मित्र त्यांच्या लाडक्या सुशांतच्या मृत्यूची घटना विसरू शकले नाही आहेत. या काळात सुशांतचे काही जुने व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. यामध्ये 'झलक दिखला जा' या रिऍलिटी शोच्या स्टेजवरील सुशांतचा एक व्हीडिओ खूपच लोकप्रिय होत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला आहे

हा व्हिडीओ तेव्हाचा आहे, जेव्हा अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि सुशांत रिलेशनशीपमध्ये होते. पवित्र रिश्ताची ही जोडी झलकच्या स्टेजवर देखील त्यांचे धमाल परफॉर्मन्स देत होती. दरम्यान Valentine स्पेशल एपिसोडमध्ये सुशांतच्या या कृतीमुळे सगळे आश्चर्यचकित झाले होते. सुशांतने हटके अंदाजात अंकिताला प्रपोज केले होते. त्यांचा हा जुना व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. यामध्ये परीक्षकांच्या खुर्चीवर अभिनेत्री माधुरी दीक्षित, मलायका अरोरा, प्रियांका चोप्रा आणि कोरिओग्राफर रेमो डिसुझा दिसत आहेत. यूट्यूबवर देखील हा व्हिडीओ अनेकदा पहिला गेला आहे.

(हे वाचा-'सुशांतच्या मृत्यूबाबत केलेले दावे सिद्ध नाही केले तर...', कंगनाचं मोठं वक्तव्य)

दरम्यान या व्हिडीओमध्ये सुशांतने प्रपोज केल्यानंतर अंकिता थेट त्याला होकार देत नाही. यावर प्रियांकाने विचारल्यावर ती म्हणते की, त्याला माझं उत्तर कळलं आहे. तिच्याकडून पुन्हा पुन्हा उत्तर मागितल्यावर ती सुशांतचे प्रपोजल स्विकारते. टेलिव्हिजन विश्वातील काही प्रसिद्ध घटनांपैकी ही एक आहे. त्याचा हा व्हिडीओ त्यावेळी देखील व्हायरल झाला होता आणि आता सुशांतच्या मृत्यूनंतर चाहते पुन्हा एकदा त्यांंच्या नात्याची आठवण काढत आहे.

दरम्यान अंकिताने सुशांतच्या मृत्यूनंतर महिनाभराने सोशल मीडियावर पहिली पोस्ट केली होती. यामध्ये तिने देवासमोर लावलेला एक दिवा पोस्ट केला होता आणि त्यावर 'Child of God' असे कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केला होता.

View this post on Instagram

CHILD Of GOD 😇

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

अंकिता आणि सुशांत हे टेलिव्हिजन विश्वातील आवडते कपल होते. त्यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री सर्वांच्या आवडीची होती. त्यामुळे त्यांचा ब्रेकअप आजही सर्वात शॉकिंग ब्रेकअपपैकी एक मानला जातो. ब्रेकअपनंतरही दोघे चांगले मित्र होते, असे अनेक मीडिया अहवालात सांगण्यात आले आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता त्याच्या कुटुंबातील सदस्यांना देखील भेटून आली होती.

(हे वाचा-सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी फिल्ममेकर आदित्य चोप्राची 3 तास चौकशी)

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 19, 2020, 8:56 AM IST

ताज्या बातम्या